एका रात्रीत मित्राचा शत्रू होतो आणि शत्रूचा मित्र होतो; उद्धव ठाकरेंना पुन्हा भाजप नेत्याची ऑफर

एका रात्रीत मित्राचा शत्रू होतो आणि शत्रूचा मित्र होतो; उद्धव ठाकरेंना पुन्हा भाजप नेत्याची ऑफर

BJP Leader offer to Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. (Thackeray) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांच्या निरोप संमारंभाप्रसंगी ते बोलत होते. तिकडे स्कोप नाहीये पण इकडे स्कोप आहे, उद्धव ठाकरे इकडे येऊ शकतात असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एक बैठक देखील झाली, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. ही बैठक सभापती राम शिंदे यांच्या दालनात झाली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीत विरोधी पक्ष नेता, हिंदी भाषा सक्ती आणि त्रिभाषा अशा काही विषयांवर चर्चा झाली. मात्र, ही बैठक देखील चर्चेचा विषय बनली. दरम्यान त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे देखील एकाच हॉटेलमध्ये दिसून आलं

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंही एकत्र येऊ शकतात, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचं विधान

देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफरनंतर आता भाजप नेते अशोक चव्हाण यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे आले तर चांगलं होईल, राजकारणात एका रात्रीत मित्राचा शत्रू होतो आणि शत्रूचा मित्र होतो. हे मी अनेक वर्षांच्या अनुभवातून शिकलो आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे, अशोच चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवी आणि आदित्य ठाकरे हे एकाच हॉटेलमध्ये दिसून आले होते, यावर देखील अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे आणि फडणवीस एका हॉटेलमध्ये आले हा योगायोग होता, ते भेटले नाहीत असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube