“पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले, प्रांजल खेवलकरांना..”, कोर्टात जोरदार युक्तिवाद, काय घडलं?

“पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले, प्रांजल खेवलकरांना..”, कोर्टात जोरदार युक्तिवाद, काय घडलं?

Pune Rave Party : पुणे शहरातील (Pune Crime) उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Police Raid On Pune Rave Party) मोठी छापा टाकला. ही पार्टी खराडीतील एका लॉजमध्ये असलेल्या खासगी फ्लॅटमध्ये सुरू होती. हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचा वापर होत असल्याचे पोलिसांनी उघड केलं. या प्रकरणी प्रांजल खेवलकरसह अन्य आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयातील युक्तिवादात खडसेंच्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न याआधीही झाला होता असा दावा खेवलकर यांच्या वकिलांनी केला.

न्यायालयात प्रांजल खेवलकर यांचे वकील आणि सरकार पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. हे राजकीय षडयंत्र असून पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले असा युक्तिवदा खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी केला. पोलिसांनी हॉटेल परिसरात साध्या वेशात येऊन तपासणी केली होती. परंतु, त्यांना काहीही आढळलं नाही. बंदूक ठेऊन शिकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप खेवलकर यांच्या वकिलांनी केला.

रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढल्या?, पत्रकार परिषदेत पुणे पोलीस काय म्हणाले?

आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी परिसरात गुन्हे शाखेने कारवाई केली. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावयासह दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 42 लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले. यानंतर खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी या कारवाईची माहिती दिली.

कोर्टातील युक्तिवाद काय?

सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की आरोपींकडून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ मध्यम प्रमाणात आहेत. कोकेन आणि गांजा कोठून आणला गेला आणि कुणाकडून विक्र केली जाणार होती, याचा तपास करण्याची गरज आहे. यातील काही आरोपींवर याआधीही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाणार आहे. आरोपींनी संगनमताने अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी टोळी स्थापन केली आहे का याचा तपास करायचा आहे. हॉटेल परिसरात तीन व्यक्ती आल्या होत्या. त्यांचा शोध घेऊन चौकशी करणे बाकी आहे असा यु्क्तिवाद सरकार पक्षाच्या वकिलांनी केला.

खेवलकरांच्या वकिलांचा दावा काय?

आरोपींनी कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन केले नव्हते. पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले असावेत. आमच्याकडे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहे. खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही किंवा ते जवळही बाळगले नाही असा युक्तिवाद वकील विजयसिंह ठोंबरे यांनी केला. पोलिसांनी रिमांड अहवाल आणि एफआयआरची प्रत वाचण्यासाठी दिली नाही. याआधीही आरोपींपैकी एक, प्रांजल खेवलकरला अडकवण्याचा प्रयत्न तीन वेळा झाला होता.

रेव्ह पार्टीत अडकलेले खडसेंचे दुसरे जावई प्रांजल खेवलकर कोण आहेत ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube