Download App

सुप्रिया सुळेंमुळे अजितदादा बाहेर? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट सांगितले

Prithviraj Chavan On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड करत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे.  राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटकरे, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेते अजित पवारांसोबत आहे. शिवसेनेच्या बंडाला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच अजित पवारांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. अजित पवारांना हे बंड का करावे लागले, यामागे काय कारण आहे, यासगळ्या बाबींवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विश्लेषण केले आहे. ( Prithviraj Chavan On Sharad Pawar and Ajit Pawar )

चव्हाण म्हणाले की, याआधी अनेक राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना जाऊन भेटले की, आपण सत्तेत जायला पाहिजे. काही आमदार एकत्र जाऊन भेटले, काही एक-एकटे भेटले. हे घडणार अशी शक्यता होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या गुप्त भेटीगाठी चालू होत्या. काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीसांची दिल्लीत अमित शाहांसोबत जी बैठक झाली होती. त्या बैठकीत थोड्या वेळासाठी अजित पवार तिथं आले होते, असे चव्हाण म्हणाले.

शिंदेंच्या शिलेदारांना निधीसाठी पुन्हा पवारांकडेच जावं लागणार? राष्ट्रवादीचा ‘अर्थ’ खात्यावर दावा!

तसेच  मला असं वाटतं की पवार साहेबांचे कुठे तरी गणित चुकलं. दोन तृतीयांश आकडा हा 36 आमदारांचा आहे. एवढे आमदार आपल्याला सोडून जातील असे त्यांना वाटले नसेल. अजित पवार पदावर असल्यामुळे आमदार त्यांना रोज भेटत होते. प्रफुल्ल पटेल हे आधीपासूनच ज्येष्ठ नेते आहे. त्यांना असे वाटत होते की, त्यांना दिल्लीची जबाबदारी दिली पाहिजे आणि राज्याची जबाबदारी अजित पवारांना दिली पाहिजे, कारण ते राज्यातील भक्कम नेते आहे. हा वाद सुरु शरद पवारांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांना वाटलं असेल की अजित पवार निघून जातील आणि पक्ष सुप्रिया सुळेंच्या हातात येईल, पण असं घडलं नाही. पण जर अजित पवारांच्या बाजूने विचार केला तर हे होणारच होतं, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आता रोहित पवार घेणार अजितदादांची जागा? बंडानंतर शरद पवारांचा ज्येष्ठांना सूचक संदेश

तसेच  भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याची आमची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षांकडून एकनाथ शिंदेंचे 16 आमदार अपात्र झाल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री करणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले.

Tags

follow us