आता रोहित पवार घेणार अजितदादांची जागा? बंडानंतर शरद पवारांचा ज्येष्ठांना सूचक संदेश

आता रोहित पवार घेणार अजितदादांची जागा? बंडानंतर शरद पवारांचा ज्येष्ठांना सूचक संदेश

पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करत शिंदे-भाजपशी (BJP) हातमिळवणी केली. 35 ते 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन थेट सरकारमध्येही सहभागी झाले. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. (Sharad Pawar, chief of the Nationalist Congress Party (NCP), has been promoting his grandnephew Rohit Pawar as the party’s young face)

एका बाजूला या सगळ्या नाट्यमय घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला चर्चेत आलेले आहेत ते राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार. 

काल कराड येथे बोलताना शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना जागा दाखवून देणार असल्याचं सांगत राष्ट्रवादीमध्ये आता नवं नेतृत्व तयार करणार असल्याचं स्पष्ट केलं. पवार यांच्या याच वक्तव्यानंतर रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. स्वतः शरद पवार हे देखील त्यांना पक्षाचा तरुण चेहरा म्हणून प्रमोट करताना दिसत आहेत.

अजित पवार यांच्या बंडखोरीची बातमी येताच रोहित पवार यांनी सर्वप्रथम शरद पवारांच्या घरी धाव घेतली. रविवारी पुण्यातील मोदीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी रोहित पवार यांना शेजारी बसण्यास सांगितले. याचवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “माझ्या जुन्या सहकाऱ्यांची मला चिंता करण्याची गरज नाही, महाराष्ट्रासाठी नवीन नेतृत्व निर्माण करणे हे माझे प्राधान्य आहे. पुण्यातील पवारांच्या एका निकटवर्तीय राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले की, त्यांचे वक्तव्य हे पक्षातील बंडखोरीच्या संदर्भात पाहायचे आहे.

भेटायला बोलावलं, गिफ्ट घेतले अन्… : बॉयफ्रेंडला लुटून, नग्नावस्थेत फेकून गर्लफ्रेंडचा पोबारा

याशिवाय मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांनी पक्षप्रमुखपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला तेव्हा मुंबईत रोहित पवार यांच्यासह काही निवडक नेते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला वरिष्ठ नेत्यांना बोलावले नसल्याचे स्पष्टीकरण पवारांनी दिले होते. तेव्हा देखील रोहित पवार राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून समोर येत आहेत का? अशा चर्चांना सुरुवात झाली होती.

सोमवारी शरद पवार कराडला गेले तेव्हा त्यांच्यासोबत रोहित पवारही होते. गेल्या दोन दिवसांतील बदलांमुळे त्यांना काम करण्यासाठी मोठा राजकीय कॅनव्हास निर्माण झाला आहे का, असे विचारले असता माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी राजकीय कॅनव्हासबद्दल कधीही विचार केला नाही. मी पक्षात आणि ज्या लोकांनी मला निवडून दिले त्यांच्यासाठी काम करत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झालेल्या रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर टीका न करण्याबाबत सावध भूमिका घेतली. “लोकांसाठी काम करताना अजित दादांनी मला वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या खूप मदत केली आहे आणि मी त्यांचा नेहमीच आदर करीन. मात्र, शरद पवार हे माझे गुरू असून त्यांनीच माझी राजकारणात ओळख करून दिली आहे. त्यामुळे मी सदैव त्याच्यासोबत असेन,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ साहेबांसोबतच, फेसबुक पोस्ट शेअर करीत थेट सांगितलं…

पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीय असलेल्या पुण्यातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने नाव न छापण्याच्या विनंतीवर सांगितले की, “शरद पवार यांनी ज्येष्ठांना स्पष्ट संदेश दिला आहे की, रोहित पवार नजीकच्या भविष्यात अजित पवारांची जागा घेतील.”

रोहित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या मोठ्या काकांच्या जवळचे समजले जाते. त्यांना पक्षात मोठ्या भूमिकेसाठी दिग्गज नेत्याने तयार केले आहे असे मानले जाते. पण बंडानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांसोबत न जाता शरद पवार यांच्यासोबतच राहणे पसंत केले आहे.

यापूर्वीही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा राजकीय वारसा कोण पुढे नेणार असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर दोन नावं प्रमुख्याने पुढे येत होती. एक रोहित पवार यांचे तर दुसरे पार्थ पवार यांचे. पार्थ पवार 2019 नंतर सक्रिय राजकारणात दिसलेले नाहीत. पण रोहित पवार सक्रिय राजकारणातही आले आणि वेगळी ओळखही निर्माण केली.

रोहित पवार सध्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार आहेत. 2017 मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. बारामतीजवळील शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube