Congress leader Sangram Thopte Resigns : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली आहे. पुणे जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा मोठा धक्का बसला आहे.संग्राम थोपटे यांनी दिला पक्षाला अखेल रामराम केला आहे. त्यांनी आज आपल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. (Thopte ) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना इमेल द्वारे राजीनामा पाठवला आहे. या निर्णयानंतर पुढील निर्णयाच्या अनुषंगाने उद्या संग्राम थोपटे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. त्यांनी भोरमधील सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना निमंत्रण दिलं आहे. गेल्या महिन्याभरातला काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे. काही दिवसांपुर्वीच काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! संग्राम थोपटे पक्षाची साथ सोडणार?
भाजपमध्ये प्रवेश करणार?
थोपटे हे तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता. अशातच संग्राम थोपटे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असून ते पक्षाला राम-राम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव, तसंच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी सत्तेची आस, हे मुख्य कारण पुढं करत त्यांनी अखेर पक्षाला राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, महाविकास आघाडीतील बडे बडे नेते भाजपच्या कंपूत विराजमान होत असताना पुण्यातील आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसला पुण्यात हा मोठा झटका असल्याचं बोलले जातय. त्यामुळे आगामी काळात संग्राम थोपटे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.