Vijay Wadettiwar : बेरोजगारांचे रोजगार गुजरातला पळवतायं आणि म्हणतायं शासन आपल्या दारी या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर खरमरीत टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात जाहीर सभा घेत आहेत. या सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विरोधकांवर टीकेची तोफ डागत आहेत. त्यावरुनच विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
गुलाबराव पाटलांना ‘जुलाबराव’ म्हणताच चिडले; मराठा आंदोलकाला केली शिवीगाळ?
विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसच्या काळात आम्ही कंत्राटी कामगारांना पर्मनंट करीत होतो पण आत्ताचं सरकार पर्मनंट कामगारांना कंत्राटी करीत असून राज्यात आता रोजगार संपत चालल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला आहे.
‘…तर मोदींना प्राइम मिनिस्टर ऑफ बीजेपी म्हणायचं का?’, इम्तियाज जलील यांचा सवाल
तसेच राज्यातील औद्योगिकीकरण क्षेत्रातील कामकागारांना सध्या रोजगार मिळत नसून त्यांचे रोजगार सत्ताधारी शेतकऱ्यांनी हिरावून घेतले आहेत. महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरातला पळवत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
सध्या राज्यातल्या बेरोजगारांचे रोजगार गुजरातला पळवताय आणि म्हणतायं शासन आपल्या दारी, या कार्यक्रमात वर्षभरातील लाभार्थ्यांना एक सोबत एकदाच बोलवून राज्य सरकार लाभ देत आहेत. त्यामध्ये सरकार नवीन काहीच करीत नाही, फक्त प्रसिद्धीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत असल्याचीही टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.