Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातव ‘या’ दिवशी करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश

Pradnya Satav : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत

Pradnya Satav

Pradnya Satav

Pradnya Satav : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. यातच राज्यातील राजकाणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून या पक्षप्रवेशासाठी जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आमदार प्रज्ञा सातव उद्या 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

प्रज्ञा सातव (Pradnya Satav) 2021 पासून विधानपरिषदेत काँग्रेसकडून आमदार आहे. भाजपाने माघार घेतल्यानंतर प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड झाली होती. माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनानंतर हिंगोलीत काँग्रेसची पकड कमजोर झाली आहे. तर आता हिंगोलीत पक्षाला आणखी एक मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. आमदार प्रज्ञा सातव उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. या पक्षप्रवेशासाठी भाजपकडून जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढविण्याबाबत चर्चा करणार ; मंत्री राधाकृष्ण विखे

कोण आहेत प्रज्ञा सातव?

आमदार प्रज्ञा सावत हिंगोलीचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहे. प्रज्ञा सावत ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत. प्रज्ञा सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुक भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानंतर बिनविरोध झाली होती. तर दुसरीकडे दिवंगत खासदार राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. 2014 मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट असताना देखील हिंगोलीमधून राजीव सातव जिंकून आले होते. यानंतर राजीव सातव देश पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

Exit mobile version