मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

Pradnya Rajeev Satav : राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या (Vidhan Pariishad Election) 11 जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे. त्यानंतर आता कॉंग्रेसकडूनही विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावांची घोषणा करण्यात आली. काँग्रेसने प्रज्ञा राजीव सातव (Pradnya Rajeev Satav) यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.

आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवणार ‘बाबू’; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

2021 मध्ये काँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी मिळालेल्या प्रज्ञा सातव यांचा कार्यकाळ 27 जून रोजी संपला आहे. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली होती. खरंतर राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत प्रज्ञा सातव यांना संधी दिली. दरम्यान, आता त्यांचा कार्यकाळ संपल्याने पक्षाने त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेत काम करण्याची संधी कॉंग्रेसने दिली आहे.

Sharad Pawar यांच्या सात शिलेदारांची आमदारकी निश्चित; जाणून घ्या कारणं… 

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना पक्षाने प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 13 जुलैला निवडणूक होणार आहे. भाजपनेही या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची यादी आज जाहीर केली. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र अखेर भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधानपरिषदेची संधी दिली आहे.

तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अहमदनगरचे शिवाजीराव गर्जे आणि परभणीचे राजेश विटेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काही वेळातच त्यांच्या अधिकृत घोषणा होणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून भावना गवळी यांचे नाव निश्चित आहे. दुसऱ्या जागेवर कृपाल तुमाने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube