Congress President Nana Patole Speech In Markadwadi : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत (EVM Issue Assembly Election) आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील (Markadwadi) ग्रामस्थांनी ईव्हीएमला मोठा विरोध केलाय. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी देखील केलीय. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) मारकडवातील ग्रामस्थांना भेट दिलीय. यावेळी नाना पटोले यांनी मारकडवाडीच्या गावकऱ्यांसोबत संवाद साधला आहे.
मोठी बातमी! कुर्ला अपघात, चालक संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
नाना पटोले मारकडवाडीत बोलताना म्हणाले की, मारकडवाडीच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाला सलाम. आपल्या बाजूचे देश पाकिस्तान, श्रीलंका येथील लोकशाही संपुष्टात येतेय. भारतात आता ईव्हीएम मशीनमधून मत चोरलं जात असल्याचं समजलं (Maharashtra Politics) आहे. आमचा आवाज निवडणूक आयोगाच्या आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचावा म्हणून प्रयत्न करत आहोत. विधानसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदा पाच वाजता एकूण मताची असलेली टक्केवारी रात्री साडेअकरा वाजता सांगितलेली आकडेवारी यात तफावत असल्याचं दृष्टीक्षेपात आलं.
बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार; अहिल्यानगर अन् संगमनेरमध्ये निदर्शने, राज्यभरात संतापाची लाट
निवडणूक संपल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यामुळे 76 लाख मतं रात्रीच्या अंधारात कशी वाढली, हा प्रश्न समोर आलाय. केंद्रिय निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा अधिकार दिलेला आहे. तीच आपल्यासाठी शक्ती आहे. पण माझा मताचा अधिकार मलाच समजण्याचा अधिकार नाही. देश पातळीवर लोकांचा आवाज दबला होता. जनतेने आवाज उचलला. नवनिर्वाचित उमेदवार उत्तम जाणकर यांनी आवाज उचचला. हा राजकीय पक्षाने आवाज उचललेला नाही.
आम्ही सर्वजण लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी जातो. मारकडवाडीच्या लोकांबद्दल त्यांच्या मनात राग असल्याची टीका नाना पटोले यांनी केलीय. अजूनही ते चिमटे घेवून बघतात, खरंच निवडून आलोय का? ही परिस्थिती राज्यात आहे. सत्ता पक्षात निवडून आलेल्या लोकांना देखील निवडून कसे आलो, याबद्दल चिंता वाटते. 2014 पर्यंत देशावर 55 लाखांचं कर्ज होतं. आज दहा वर्षात ते कर्ज 220 लाख कोटींचं झालंय.
आता त्यांची मताची भीती संपली आहे. त्यामुळे ते सत्ता आल्यानंतर देश विकतील. ही लढाई तुम्ही मारकडवाडीवाले लढत आहे, त्यामुळे तुम्हाला सलाम आहे. राहुल गांधींचं मत असं आहे की, लोकशाही टिकवण्यासाठी मताचा अधिकार बॅलेटवर व्हावा. वेळ आल्यास ही चळवळ मारकडवाडीतून सुरू होईल, असं देखील नाना पटोले यावेळी यांनी म्हटलंय. निवडणूक आयोग देखील त्यांची कठपुतली आहे. आम्ही अनेक लोक राजीनामा देण्यासाठी तयार आहोत, तसं ते म्हणाले आहेत. अनेक गावात ग्रामस्थांचा ठराव बॅलेटवर मतदानासाठी होत आहे. याची सुरूवातच देशात मारकडवाडीने केली आहे. पोलिसांनी देखील लोकशाहीची लढाई लढणाऱ्यांमागे उभं राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले आहेत. या लोकांची चळवळ हारण्या-जिंकण्यासाठी नाही तर लोकशाही वाचविण्यासाठी आहे.