मोठी बातमी! कुर्ला अपघात, चालक संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Kurla Accident Case : कुर्ला अपघात प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार या कुर्ला अपघात प्रकरणात चालक संजय मोरेला

  • Written By: Published:
Kurla Accident Case

Kurla Accident Case : कुर्ला अपघात प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार कुर्ला अपघात प्रकरणात (Kurla Accident Case) चालक संजय मोरेला (Sanjay More) 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सोमवारी रात्री बेस्ट बस (BEST bus) रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात आतपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 जण जखमी झाले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरु आहे.

माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकवर कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे. तर , या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 5 लाखांची नुकसान भरपाई घोषित केली आहे.

माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री 10 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पादचाऱ्यांना बसने धडक दिली. या अपघातात सुरूवातीला 30  ते 32 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली होती. सध्या जखमींवर कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा आणि इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विजय अन् भारताची धाकधूक वाढली, जाणून घ्या WTC Final साठी नवीन समीकरण

follow us