Dahi Handi 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कांदिवली (पू.) येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राजपति सेवा मंडळातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात (Dahi Handi 2025) मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी भाजपा (BJP) आणि निवडणूक आयोग (Election Commission) यांच्या संगनमताने होत असलेल्या मतचोरीच्या निषेधार्थ विशेष हंडी फोडून काँग्रेसने (Congress) आक्रोश व्यक्त केला.
“फोडू आम्ही मतचोरीची हंडी, फोडू आम्ही भ्रष्टाचाराची हंडी” अशा घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, एक व्यक्ती-एक मत हा आपल्या संविधानाचा पाया आहे. निवडणूक आयोगाची जबाबदारी त्याचे रक्षण करणे आहे. परंतु आयोगच सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करून नागरिकांच्या अधिकारावर गदा आणत आहे.
Rahul Gandhi : “मतदान चोर, खुर्ची सोड” – काँग्रेस पक्षाचा शहरात मशाल मोर्चा
यावेळी खासदार वर्षा एकनाथ गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या, “मतांची चोरी ही आपल्या लोकशाहीची चोरी आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनसत्याग्रह सुरू केला आहे. मतचोरीविरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवावा.”
अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना, बायको नांदायला येईना; पतीने 4 मुलांसह विहिरीत जीवन संपवले