वडिलांच्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेणार ; काँग्रेसचं पार्थ पवारांना प्रत्युत्तर

Congress On Parth Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात

Congress On Parth Pawar

Congress On Parth Pawar

Congress On Parth Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारी दिल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधत महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल आहे असं म्हटले होते.

पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या या टीकेवर आता काँग्रेसकडून (Congress) जोरदार हल्लाबोल करण्यात आले आहे. धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक (Baramati Bypoll) बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून (Mahayuti) अनेक प्रयत्न करण्यात आले होते मात्र या निवडणुकीत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आकाश मोरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. या टीकेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देत अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा आम्ही निवडणुकीतून माघार घेतो असं आव्हान देखील काँग्रेसकडून पार्थ पवार यांना देण्यात आले आहे.

काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?

हॉर्मुझमधून भारतासाठी आनंदाची बातमी; इराणकडून मोठी घोषणा

नेमकं काय म्हणाले पार्थ पवार?

त्यांना काय करायचं ते कळायला हवे. ते काय करतायत, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांना विचार केला असेल, त्यांना करु द्या पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात ते दिसेल. लोक विसरत नाही. लोकांच्या मनात दादांविषयी प्रेम आहे. अशा वेळेस एवढ्या मॅच्युअर पक्षाने हा निर्णय घेणे जिथे एवढे मोठे नेते आहेत ते अतिशय चुकीचे आहे. आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते, तसे सामोरे जावे लागते आम्ही सामोरे जाऊ. आम्ही कोणाला फोन करणार नाही, ते अतिशय चुकीचे आहे. आपण कोणाल थांबवू शकत नाही.जशी वेळ येते तसे सामोरे जावे लागते. आम्ही सामोरे जाऊ असं पार्थ पवार म्हणाले होते.

Exit mobile version