Strait of Hormuz : हॉर्मुझमधून भारतासाठी आनंदाची बातमी; इराणकडून मोठी घोषणा

Strait of Hormuz : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे बंद असणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीतून आता भारतासह इराणच्या

Strait Of Hormuz

Strait of Hormuz : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे बंद असणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीतून आता भारतासह इराणच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी विशेष उपायोजना करण्यात येणार असल्याची घोषणा इराणकडून करण्यात आली आहे. इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी सोमवारी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी केवळ अशाच देशांसाठी बंद आहे जे इराणशी युद्धजन्य स्थितीत आहेत असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोहम्मद फथाली (Mohammad Fathali) यांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) इराण आणि ओमानच्या प्रादेशिक जलक्षेत्रात येते. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांमधील सुरक्षा आणि संरक्षणाच्या महत्त्वावर इराणने सातत्याने भर दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा आंतरराष्ट्रीय जलक्षेत्राचा भाग नाही. उलट, ती इराण आणि ओमानच्या प्रादेशिक व अंतर्गत जलक्षेत्रात स्थित आहे. त्यामुळे, या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात या दोन्ही राष्ट्रांच्या हिताचे रक्षण करणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे. या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीच्या अटींबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार तेहरान आणि मस्कत यांच्या अधिकारक्षेत्रात येतो.

त्यांनी पुढे सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलने (Israel) हाती घेतलेल्या लष्करी व आक्रमक कारवायांचा सर्व स्वतंत्र राष्ट्रांनी निषेध करावा, अशी इराणची अपेक्षा आहे. इराणने कधीही युद्धाची इच्छा बाळगली नाही आणि आपण कोणत्याही संघर्षाची सुरुवात करणार नाही, या गोष्टीचा इराणने वारंवार पुनरुच्चार केला आहे, असे राजदूतांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

जर मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत करार झाला नाही, तर चार तासांत इराणचा…, ट्रम्प यांची पुन्हा धमकी

डोनाल ट्रम्प यांना प्रत्युत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला धमकी देत वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. या धमकीवर बोलताना मोहम्मद फथाली म्हणाले की, आमची संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. आम्ही कधीही पुन्हा ‘पाषाण युगात’ जाणार नाही. आज आपण जे काही पाहत आहोत ते इतर कशापेक्षाही अधिक म्हणजेच ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यासारख्या व्यक्तींच्या वर्तनात आणि वक्तव्यांतून प्रकट झालेला आधुनिक रानटीपणाच आहे. मुलांची हत्या करणे, तसेच शाळा, विद्यापीठे, रुग्णालये आणि अगदी लस व औषध उत्पादन केंद्रांवरही हल्ले करणे, ही या हिंसक आणि अमानुष मानसिकतेची स्पष्ट निदर्शक आहेत.

follow us