दोषींना कठोर शिक्षा द्या; राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर संघाची पहिली प्रतिक्रिया

RSS On Ram Mandir Donations Theft  :  अयोध्येतील राम मंदिर देगणी चोरी प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय

RSS On Ram Mandir Donations Theft

RSS On Ram Mandir Donations Theft  :  अयोध्येतील राम मंदिर देगणी चोरी प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. या प्रकरणात पहिली प्रतिक्रिया देत संघाने मोठी मागणी केली आहे. या प्रकरणात एसआयटी तपासात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटले आहे.  देणगी पेटीतील चोरीच्या घटनेमुळे रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धेला धक्का लागला असं देखील होसबळे यांनी म्हटले आहे.

दत्तात्रेय होसबळे (Dattatreya Hosabale) म्हणाले, पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आणि कोट्यवधी रामभक्तांचे समर्पण, त्याग व बलिदान यामुळे श्री राम जन्मभूमीवर उभारलेले भव्य मंदिर संपूर्ण हिंदू समाजासाठी श्रद्धा, आस्था आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. अयोध्येतील श्री राम लल्ला मंदिरातील देणगी पेटीतून निधी चोरीला जाण्याच्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण समाज आणि रामभक्तांच्या भावना व श्रद्धेला ठेच पोहचली आहे. या घटनेमुळे आम्हा सर्वांना अत्यंत वेदना झाल्या आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने एसआयटी (SIT) स्थापन केली असून तपास सुरू केला आहे. या तपासात दोषी आढळणाऱ्या कोणालाही कठोर शिक्षा होईल याची खात्री करणे आवश्यक आहे.

होसबळे पुढे म्हणाले की, आरएसएससह संपूर्ण हिंदू समाजाची अशी अपेक्षा आहे की, या अत्यंत निंदनीय घटनेकडे एक असाधारण बाब म्हणून पाहिले जावे. तसेच मंदिराचे व्यवस्थापन आणि कामकाजातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी गंभीर पावले उचलली जावीत, जेणेकरून श्री राम मंदिराप्रती कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा आणि आस्था अखंड व दृढ राहील. सध्याची गोंधळ आणि अनिश्चिततेची स्थिती संपली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

तर दुसरीकडे राम मंदिर देणगी प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या गेल्या पाच वर्षांच्या हिशोबाचे पुन्हा लेखापरीक्षण करेल, कारण प्राथमिक तपासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता असल्याचे संकेत मिळाले आहेत.

केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांना मोठा धक्का; सिया अन् चेतनला न्यायालयीन कोठडी –

आरोपीकडून किती रक्कम जप्त करण्यात आली?  

मीडिया अहवालानुसार  या प्रकरणात अविनाश शुक्लाकडून 20.39 लाख रुपये, करुणेश पांडेकडून 18.07 लाख रुपये, अनुकल्प मिश्रकडून 16.82 लाख रुपये, लवकुश मिश्रकडून 14.25 लाख रुपये, रामाशंकर मिश्रकडून 7.32 लाख रुपये आणि रामाशंकर यादव (उर्फ टिनू) याच्याकडून 1 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

follow us