Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात सामाजिक तेढ निर्माण होईल अशा घटना वाढतच आहे. औरंजेबाचे फोटो झळकावणे हे प्रकार सुरु असताना आता एक अत्यंत धक्कादायक प्रकार नगर शहरात घडल्याचे समोर आले. इतिहासाची साक्ष असलेली ऐतिहासिक वास्तू भुईकोट किल्ल्यात देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, १५ ऑगस्टच्या दिवशी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला आहे त्याच दिवशी भारताचे तुकडे करण्याची भाषा व घोषणा काही तरुणांनी केली आहे. अशा घोषणा दिल्यामुळे त्या ठिकाणी तैनात असलेल्या लष्करी जवानांनी या तरुणांना ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलिसांच्या हवाली केले.
राज ठाकरेंनी हिंदुत्वावरुन कूस बदलली; निवडणुकांपूर्वी पुन्हा खेळलं मराठी कार्ड?
दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून याप्रकरणी लष्करी जवानांकडून यातडीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. सदर तक्रारीत भारत देशाबद्दल आक्षेपार्य विधान करून भारताचे तुकडे होतील अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. याबाबत सांगण्यात आले. तसेच या तक्रारीवरून सार्वजनिक एकोप्याला बाधा होईल त्यामुळे भिंगार कॅम्प येथे भादवी.153 (अ )134 प्रमाणे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामधील तीन जण अल्पवयीन असल्यामुळे त्यांना नोटीस देऊन पालकांच्या हवाली करण्यात आले आहे.