IAS Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचं रोज एक नव प्रकरण समोर येत असल्याने दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढतच असल्याचं दिसतय. (Pooja Khedkar) पूजा खेडकर यांची वाशिमच्या महिला पोलीस टीमकडून चौकशी करण्यात आली आहे. रात्री उशिरा तब्बल तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती आहे. (Manorama Khedkar) दरम्यान, ही चौकशी कशासंदर्भात झाली हे समजू शकलेलं नाही. मात्र, खेडकर यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी संवाद नाही भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त विधान; इचलकरंजीची केली पाक व्याप्त काश्मिरशी तुलना
वाशिम पोलिसांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्याकडून परवानगी घेतली होती. त्यानंतर पूजा खेडकर यांची रात्री उशिरा चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर वाशिम पोलिसांची टीम माध्यमांशी न बोलता निघून गेली. त्यामुळे ही चौकशी नेमकी कशासंदर्भात होती हे समजू शकलेलं नाही.
अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं झिम्बाब्वेचा पराभव पण धक्का पाकिस्तानला; टीम इंडियाने बनवलं खास रेकॉर्ड
पूजा खेडकर प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र राज्यातील अनेक हॉस्पिटलमधून घेतलं आहे. नगरच्या जिल्हा रुग्णालयातून त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजारपणाबाबत प्रमाणपत्र घेतलं आहे. याशिवाय, त्यांनी पिंपरी चिंचवडमधील हॉस्पिटलमधून एक अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं आहे. त्यामुळे त्या संशयाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत.