झिम्बाब्वेचा पराभव पण धक्का पाकिस्तानला; टीम इंडियाने बनवलं खास रेकॉर्ड
Team India broke Pakistan Record : भारतीय क्रिकेट संघाने शुभमन गिलच्या (Team India) नेतृत्वात झिम्बाब्वे विरोधात पाच टी 20 सामन्यांची मालिका (IND vs ZIM) खेळली. या मालिकेत टीम इंडियाने 4-1 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला. या सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. नंतर मात्र दमदार वापसी करत चारही सामने संघाने जिंकले. दुसरा सामना 100 धावांनी तर तिसरा टी 20 सामना 23 धावांनी जिंकला. चौथ्या सामन्यात भारताने 10 विकेट्सने झिम्बाब्वेचा पराभव केला. पाचव्या सामन्यात 42 धावांनी विजय मिळवला.
भारताने मोडलं पाकिस्तानचं रेकॉर्ड
झिम्बाब्वेविरोधात चार सामने सामने जिंकण्यासह भारताने पाकिस्तानचे रेकॉर्डही (Pakistan) मोडीत काढले. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचे रेकॉर्ड भारतीय संघाने केले आहे. या बरोबरच भारताने पाकिस्तान संघाचे रेकॉर्डही मोडले आहे. भारताने विदेशात आतापर्यंत 51 टी 20 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 50 सामने विदेशात जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या (Australia) क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने विदेशात आतापर्यंत 39 सामने जिंकले आहेत. 37 टी 20 विजयासह न्युझीलंड चौथ्या (New Zeland) तर 35 टी 20 विजयासह इंग्लंड पाचव्या (England) क्रमांकावर आहे.
IND vs ZIM : भारतीय संघाचा विजयी चौकार, शेवटच्या T20 मध्ये झिम्बाब्वेला दिली 42 धावांनी मात
विदेशात सर्वाधिक टी 20 जिंकणारे संघ
भारत 51 सामने
पाकिस्तान 50 सामने
ऑस्ट्रेलिया 39 सामने
न्युझीलंड 37 सामने
इंग्लंड 35 सामने
संपूर्ण टी 20 सामन्यांचा विचार केला तर येथेही भारतानेच बाजी मारली आहे. भारताने आतापर्यंत 232 टी 20 सामन्यात 152 सामने जिंकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. पाकिस्तानने आतापर्यंत 245 पैकी 142 सामन्यात विजय मिळवला आहे. 150 किंवा त्यापेक्षा जास्त सामने जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ बनला आहे. तिसऱ्या क्रमांकावर न्युझीलंड आहे. या संघाने आतापर्यंत 220 पैकी 111 सामने जिंकले आहेत. या यादीत 105 विजयासह ऑस्ट्रेलिया चौथ्या तर 104 विजयासह दक्षिण आफ्रिका पाचव्या (South Africa) क्रमांकावर आहे.
IND vs SA : टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! प्रमोशन दिलं अन् ‘बापू’ने सामनाच फिरवला
दहा वर्षांनंतर पुन्हा आयसीसी ट्रॉफीवर कब्जा
मागील दहा वर्षांच्या काळात टीम इंडियाने दहा (IND vs SA) मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत मात्र प्रत्येक वेळी विजेतेपदानं हुलकावणी दिली. भारतीय संघाने (Team India) सन 2013 मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात (MS Dhoni) आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा अशी कामगिरी यंदाच्या टी 20 विश्वचषकात भारताने करून दाखवली. फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं.