IND vs SA : टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! प्रमोशन दिलं अन् ‘बापू’ने सामनाच फिरवला

IND vs SA : टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! प्रमोशन दिलं अन् ‘बापू’ने सामनाच फिरवला
IND vs SA : टी 20 विश्वचषकाच्या अंतिम आणि क्षणाक्षणाला (IND vs SA) उत्कंठा वाढवणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने सात (Team India) धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव (South Africa) केला. या विजयासह भारताने तेरा वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीवर (T20 World Cup 2024) नाव कोरल. भारत विश्वविजेता होण्यात संघातील प्रत्येक खेळाडूच मोठं योगदान आहे. या सामन्यात एक वेळ अशी आली होती की भारत सामना गमावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने (Rohit Sharma) घेतलेले निर्णय मास्टरस्ट्रोक ठरले. यातलाच एक निर्णय म्हणजे अक्षर पटेल.
प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीलाच आफ्रिकेच्या गोलंदाजांनी विकेट घेत भारताच्या फलंदाजांवर दडपण आणले. एक वेळी तर 34 धावांतच भारताचे तीन आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. कर्णधार रोहित शर्मा 9, ऋषभ पंत 0, सूर्यकुमार यादव 3 अशी गळती लागली होती. त्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये आले होते. यानंतर संघ व्यवस्थापनाने धाडसी निर्णय घेत डाव्या हाताच्या अक्षर पटेल याला (Axar Patel) मैदानात पाठवलं. हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला.
अक्षरने विराट बरोबर मजबूत भागीदारी करत संघाचा डाव सावरला तसेच धावांची गती सुद्धा कमी पडू दिली नाही. अक्षरने 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिवम दुबे (Shivam Dubey) आणि हार्दिक पांड्या यांच्या (Hardik Pandya) आधी अक्षरला पाठवणे हा खरच मास्टर स्ट्रोक ठरला. ज्यावेळी रोहित, पंत आणि सूर्या बाद झाले त्यावेळी कुणालाच वाटलं नव्हतं की भारताच्या 170 धावा होतील. पण अक्षरच्या खेळीने भारताला अडचणीच्या काळात सावरलं. एका बाजूला विराट कोहली स्ट्राइक बदलत राहिला तर दुसऱ्या बाजूने अक्षर चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत राहिला.
भारतीय फलंदाजीचा पाहिला षटकार अक्षरनेच लगावला. अक्षरने 31 चेंडूत 47 धावांची अतिशय उपयुक्त खेळी केली. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 151.61 इतका राहिला. त्याला अर्धशतक करता आले नाही पण विराट बरोबर त्याने 54 चेंडूत 72 धावांची केलेली भागीदारी संघाला सावरणारी ठरली. यानंतर दमदार गोलंदाजी करत भारतीय संघाने टी 20 विश्वचषक आपल्या नावावर केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज