IND vs SA : दहा वर्षात दहा टुर्नामेंटमध्ये पराभव..आता भारताला विजेतेपदाची नामी संधी

IND vs SA : दहा वर्षात दहा टुर्नामेंटमध्ये पराभव..आता भारताला विजेतेपदाची नामी संधी

IND vs SA : मागील दहा वर्षांच्या काळात टीम इंडियाने दहा  (IND vs SA) मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत मात्र प्रत्येक वेळी विजेतेपदानं हुलकावणी दिली. भारतीय संघाने (Team India) सन 2013 मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात (MS Dhoni) आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा अशी कामगिरी करणं शक्य झालं नाही. या नंतर सगळ्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. आता मात्र पुन्हा अशीच संधी चालून आली आहे. भारतीय संघ टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) अंतिम सामन्यात पोहोचला आहे. शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना होणार आहे.

या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. तेव्हा आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक पटकावण्याची नामी संधी चालून आली आहे. परंतु मागील दहा वर्षात आयसीसी स्पर्धांमध्ये जशी भारताची कामगिरी राहिली आहे त्यावरून चाहत्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

आयसीसी स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेला चोकर्सचा शिक्का बसलेला आहे. यावेळी मात्र या संघाने दमदार कामगिरी करत अंतिम सामना गाठला आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच फायनल पर्यंत पोहोचला आहे. चांगली कामगिरी करून संघाने चोकर्सचा शिक्का काही प्रमाणात पुसला आहे. आता अशीच परिस्थिती भारताच्या बाबतीतही दिसून येत आहे.

IND Vs ENG : साहेबांचा पराभव; टीम इंडियाने बदलला 112 वर्षांपूर्वाचा इतिहास; कसोटी मालिका 4-1 ने जिंकली

मागील दहा वर्षांच्या काळात भारतीय संघाला दहा आयसीसी स्पर्धांमध्ये हुलकावणी मिळाली आहे. टीम इंडियाने 2013 मध्ये शेवटचे आयसीसी विजेतेपद मिळवलं होतं. यानंतर मात्र संधी चालून आल्या परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. 2013 मध्ये भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता.

भारताने 2013 नंतर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील चार आयसीसी स्पर्धांमध्ये दहा वेळा भाग घेतला. आता या टी 20 स्पर्धेत भारताचा हा अकरावा सहभाग आहे. मागील दहा टुर्नामेंट मध्ये नऊ वेळा टीम इंडियाने नॉकआऊट स्टेजमध्ये क्वलिफाय केले होते. 2021 मधील वर्ल्डकपमध्ये मात्र साखळी फेरीतच संघ बाद झाला होता.

या दरम्यानच्या 9 नॉकआऊट स्टेजमधील 13 सामन्यापैकी 9 सामन्यात पराभूत व्हावे लागले. तर चार सामने जिंकले. या जिंकलेल्या चार सामन्यांत तीन सामने सेमी फायनल फेरीतील होते. तर एक सामना क्वार्टर फायनल फेरीतील होता. यावरून अंदाज लावता येतो की भारतीय संघाने मागील दहा वर्षात जे सामने खेळले आहेत त्यात पाच वेळेस चॅम्पियन बनण्याची संधी चालून आली होती.

IND vs ENG : कुलदीप-अश्विनच्या घातक गोलंदाजीपुढं इंग्लंडचं लोटांगण, 218 धावांवर संघ तंबूत

दक्षिण आफ्रिकेचा संघ तर सेमी फायनलमध्येच पराभूत होत आला आहे. यावेळी मात्र प्रथमच या संघाने फायनलमध्ये धडक दिली आहे. आफ्रिकेच्या वन डे वर्ल्डकप इतिहासातील हा पहिलाच फायनल सामना आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाकडे दहा वर्षांचा दुष्काळ संपवण्याची मोठी संधी आली आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारणार आणि विश्वचषकावर नाव कोरणार याचं उत्तर सामना संपल्यानंतर मिळेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube