IND vs SA : टीम इंडियाच ‘बादशहा’! 13 वर्षांनंतर ICC ट्रॉफी भारतात

IND vs SA : टीम इंडियाच ‘बादशहा’! 13 वर्षांनंतर ICC ट्रॉफी भारतात

T20 World Cup Final 2024 : T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 13 वर्षानंतर ICC इन्व्हेन्टमध्ये टॉफी जिंकली आहे. हा सामना भारतीय संघाने 7 धावांनी जिंकला आहे.

T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामन्यात (T20 World Cup Final 2024) भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या.

विराट कोहलीने (Virat Kohli) 76 धावांची खेळी केली तर अक्षरने तुफान फटकेबाजी करत 31 चेंडूत 47 धावा केल्या. अक्षरने या दरम्यान एक चौकार आणि चार षटकार मारले. याच बरोबर शिवम दुबेने 27 आणि रवींद्र जडेजाने 2 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्या 5 धावा करून नाबाद राहिला होता.

177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहने आफ्रिकेला मोठा धक्का देत रिझा हेड्रिक्सला बाद केले तर त्यानंतर अर्शदीप सिंगने तिसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार एडन मार्करमला बाद करत आफ्रिकेला या सामन्यात बॅकफूटवर नेले होते. मात्र त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि क्विंटन डी कॉकने आफ्रिकेचा डाव सावरला. ट्रस्टन स्टब्स 21 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला बाद केला. स्टब्सने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. तर डी कॉकने 31 चेंडूत 39 धावा केल्या.

T20 World Cup 2024 : सूर्यकुमार यादव पुन्हा फ्लॉप! खराब कामगिरीने चाहते निराश

15 व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने 24 धावा दिल्या. येथून भारतीय संघाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या जवळ घेऊन गेले. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेनला बाद करून भारतीय संघाला या सामन्यात कमबॅक करून दिला. हेनरिक क्लासेन 27 चेंडूत 52 धावा केल्या. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत भारतीय संघाला तब्बल 13 वर्षानंतर ICC इन्व्हेन्टमध्ये टॉफी जिंकल्यास मदत केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube