Download App

राज्यावर पुन्हा घोंगावतेय कोरोनाचे संकट; केंद्राने उचलले महत्वपूर्ण पाऊल

मुंबई : दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात देखील मोठ्या प्रमाणावर झाला होता. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. यातच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच दिवसात तब्बल 226 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आता याच पार्श्वभूमीवर केंद्राने देखील महत्वाची पाऊले उचलत परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करण्यात यावी अशा सूचना राज्याला दिल्या आहेत.

कोरोनाने दोन वर्षांपूर्वी जगभरात कहर केला होता. यातच या व्हायरसने चीन पाठोपाठ भारतात धुमाकूळ घातला होता. कोरोना रुग्णसंख्या भारतात मोठ्या प्रमाणावर फैलावत होती. यातच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले होते. मात्र कोरोना व्हॅक्सिन बाजारात दाखल झाल्यानंतर या व्हायरसचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा कोरोनाने राज्यात एंट्री केली असून राज्यात एकाच दिवसात तब्बल 226 नवे रुग्ण आढळून आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.

तसेच चिंतेची बाब म्हणजे कोरोना बरोबरच राज्यात H3N2 या व्हायरसचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. या व्हायरसने बाधित झालेले रुग्ण देखील महाराष्ट्रात आढळून आले आहे. यातच या व्हायरसने आतापर्यंत दोघांचा बळी घेतला आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना आता कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केल्याने पुन्हा एकदा परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकार देखील सतर्क झाले आहे. केंद्राने कोरोना काळात जारी केलेल्या गाईडलाईन्स पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याला अवलंबण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची कोविड चाचणी करणे, मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, लक्षणे आढळ्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे… आदी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

सावधान… नव्या व्हायरसने घेतला राज्यातील दोघांचा बळी

देशात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करण्यात आला होता. बराच काळ ओलांडल्यानंतर व्हॅक्सिन बाजारात दाखल झाली होती. मात्र तोपर्यंत या व्हायरसने प्रभावित झालेले अनेकांचे प्राण गेले होते. यामुळे जुनी परिस्थिती पाहता कोरोनाची सध्याची सुरु असलेली वाटचाल केंद्राने गांभिर्यांनी घेतली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य यंत्रणांनी देखील अलर्ट राहावे अशा सूचना केंद्राने राज्याला दिल्या आहेत.

Tags

follow us