Supreme Court dismisses petition opposing OBC reservation : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) मागील काही वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील (Local government elections) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महानगर पालिका (Municipal Corporation, नगर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नवीन प्रभार रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) करण्याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हिरवा कंदील दिलाय. कोर्टाने आज (दि. 4 ऑगस्ट) महाराष्ट्रातील 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.
‘दशावतार’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज! टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या
या याचिकेमध्ये नव्या प्रभाग रचनेला आव्हान करण्यात देण्यात आलं होतं. मात्र, आज कोर्टाने नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून 27 आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली. त्यामुळं त्यामुळं 11 मार्च 2022 च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार नाहीत. तर 6 मे रोजीच्या आदेशानुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होणार आहेत. ही प्रभाग रचना महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांसाठी लागू असणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं प्रभाग रचनेसंदर्भातील जुने वाद संपुष्टात आले असून, नवीन रचनेला कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
कुणी राहत असलं तर कसं बाहेर काढणार?, धनंजय मुंडेंना बंगला सुटेना, भुजबळांना बंगला मिळेना..
निवडणुका 27% ओबीसी आरक्षणासह होणार
याचिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 27% ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यात आला होता. 27% ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी याचिका देखील कोर्टाने फेटाळली. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27% ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ओबीसी समजातून आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल ओबीसी समाजाला स्थानिक पातळीवर राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यास मदत करणार आहे.
नेमका निकाल काय?
– नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या
– 27 टक्के आरक्षणाला विरोध करणाऱी याचिका फेटाळली.
– 27 टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार
– 11 मार्च 2022च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार नाहीत.
– 6 मे रोजीच्या आदेशानुसार 27 टक्के ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होणार
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.