Download App

अरुणकाकांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

Arun Jagtap यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर अमरधाम या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

crowd gathered in Arun Jagtap funeral was held with state honors : अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर अमरधाम या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी शहरासह जिल्ह्यातीन जनसागर उळसल्याचं पाहायला मिळालं. तसेच अनेक राजकीय, समाजिक क्षेत्रातील नेते आणि मान्यवर उपस्थित होते.

स्टॅम्प पेपर विक्रेते सरकारी नोकर, भ्रष्टाचार केला तर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश  

यावेळी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली केली. यामध्ये मंत्री दत्ता मामा भरणे, अंकुश काकडे, आमदार अमोल खताळ, आमदार सुरेश धस, खासदार निलेश लंके, माजी खासदार सुजय विखे, भानुदास कोतकर, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार भीमराव धोंडे, बबनराव पाचपुते,राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, अशोक सोनवणे, अभय आगरकर, शशिकांत गाडे, हभप तनपुरे महाराज, सुनील अण्णा टिंगरे यांचा समावेश होता. तर यावेळी मंत्री विखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकांसाठी अहोरात्र काम करणारा नेता गमावला- मंत्री विखे

अरुणकाकांच्‍या निधनाची घटना ही मनाला वेदना देणारी आहे. मागील काही दिवसांपासून पुणे येथील रुग्‍णालयात त्‍यांच्‍यावर उपचार सुरु होते. या दरम्‍यान रुग्‍णालयात जावून त्‍यांच्‍यावर सुरु असलेल्‍या उपचारांची माहीती डॉक्‍टरांकडून जाणून घेत होतो. यासर्व परिस्थितीतून ते बाहेर येतील अशी अपेक्षा होती. मात्र नियतीच्‍या मनात काही वेगळेच होते.अरुणकाकांच्‍या जाण्‍यामुळे लोकांसाठी अहोरात्र काम करणारे एक नेतृत्‍व जिल्‍ह्याने गमवाले आहे. युवक संघटने पासून स्‍वत:ची एक वेगळी ओळख जिल्‍ह्याच्‍या राजकारणात त्‍यांनी निर्माण केली होती. नगराध्‍यक्ष पद ते विधान परिषदेचे सदस्‍य असा त्‍यांचा राजकारणाचा प्रवास हा केवळ लोकांसाठी होता. क्रिडा क्षेत्राची अत्‍यंत आवड असलेला एक क्रीडा प्रेमी म्‍हणून आ.जगताप यांची ओळख ही सर्वदुर होती.त्‍यांच्‍या जाण्‍याने जगताप कुटूंबावर मोठे संकट ओढवले आहे. या संकटातून आ.संग्राम जगताप आणि त्‍यांच्‍या कुटूंबियांना बाहेर पडण्‍याची शक्‍ती परमेश्‍वराने द्यावी.

विधानसभेत पराभव, अजितदादांचा फेटा बांधण्यास नकार, माजी आमदाराला अश्रू अनावर

अरुणकाका जगताप यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर नगर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ते व्याही होते. अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

follow us