Ashish Shelar : वांद्रे पश्चिम येथील 108 वर्षे पुर्ण करणाऱ्या नॅशनल लायब्ररीच्या अध्यक्षपदी आज राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वी ते या ग्रंथालयाचे उपाध्यक्ष म्हणून सक्रिय होते. संस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.सदर सभेला 35 सभासद उपस्थित होते. या सभेच ग्रंथालयाच्या नव्या कार्यकारणीची घोषणा सर्व प्रक्रिया पूर्ण करुन निवडणूक अधिकाऱ्यांनी केली.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ
2025 ते 2030 साठी खालील प्रमाणे असेल.
अध्यक्ष ॲड. आशिषजी शेलार
-(सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य)
कार्याध्यक्ष- प्रमोद महाडिक
कोषाध्यक्ष- सुनील धोत्रे
प्रमुख कार्यवाह – विद्याधर झारापकर
संयुक्त कार्यवाह – तृणाल वाघ
सौ उर्मिला रांगणेकर, प्रल्हाद महाडदळकर
कार्यमंडळ सदस्य
ॲड. दीपक पडवळ
पांडुरंग उपळकर
अनिल जोशी
ॲड. नकाशे चंद्रप्रकाश
राजेंद्र लाड
संध्या दुखंडे
विनायक हजारे (स्वीकृत)
संदीप मेटकर
शांताराम चव्हाण