Download App

डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर; गुंतवणूकदारांच्या ८०० कोटींचं काय?

2018 साली गुंतवणूकदार आणि बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी.एस. कुलकर्णी यांची तब्बल पाच वर्षानंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्यावर 2018 साली बॅंक आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. अखेर पाच वर्षांनंतर कुलकर्णी जामिनावर बाहेर आले आहेत. डी.एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणूकदाराचं 800 कोटी आणि बॅंकेंचं 1200 कोटी रुपयांचं कर्ज होतं.

Chiranjeeviने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर करत म्हणाला…

बॅंक आणि गुंतवणुकदारांच्या फसवणुकीप्रकरणी डीएसके यांच्या पत्नीसह मुलगा. जावई. मेहुणे, कंपनीतील लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर फसवणुकीच्या कायद्यांतर्गत त्यांना किती काळ तुरुंगात ठेवता येतं याची चाचपणी न्यायालयाकडून करण्यात आली. त्यानंतर आता डीएसके यांना जामिन मिळाला असून त्यांच्या एकूण १३५ मालमत्ता आहेत. गृह प्रकल्प, मोकळ्या जागा, ड्रीम सीटी ३०० एकराचा प्रकल्प असेल यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र गुंतवणूकदारांचा एक रुपयाही परत मिळालेला नाही.

Onion Issue : जखम डोक्याला अन् मलम पायाला; केंद्राच्या तोडग्यावर राष्ट्रवादीची टीका

डीएसकेंच्या अटकेनंतर त्यांच्या मालमत्तेचा नवीन घोटाळा समोर आला. डीएसकेंच्या मालमत्ता कवडीमोल भावाने खरेदी करण्याचं काम सुरु होतं. मालमत्ता खरेदी करुन बॅंकांकडे पैसे वळते करण्याचा घोटाळा असल्याचा आक्षेप गुंतवणूकदारांकडून करण्यात आला आहे. कुलकर्णी यांच्यावर एकूण 1200 कोटींचं कर्ज असून राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्याला या प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि लिलाव करुन गुंतवणूकदारांचे पैसे द्यावेत, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, आज डीएसकेंचे फोटो प्रकाशझोतात आले असून त्यांना तब्बल पाच वर्षांनंतर जामीन मंजूर झालेला आहे. यापूर्वीही त्यांना जामीन मंजूर झालेला होता, परंतु त्यांची सुटका झालेली नव्हती, आता त्यांची सुटका करण्यात आलेली आहे.

Tags

follow us