Onion Issue : जखम डोक्याला अन् मलम पायाला; केंद्राच्या तोडग्यावर राष्ट्रवादीची टीका

  • Written By: Published:
Onion Issue : जखम डोक्याला अन् मलम पायाला; केंद्राच्या तोडग्यावर राष्ट्रवादीची टीका

Rohit Pawar On Maharashtra Onion Issue : राज्यातील कांदा प्रश्नावर एकीकडे केंद्र सरकराने सूत्र हलवत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्विट करत दिली आहे. फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर असून, तेथे असतानाही राज्यात आणिबाणीचा प्रश्न बनलेल्या कांदा प्रश्नावर फडणवीसांची मध्यस्थी उपयोगी ठरल्याचे बोलले जात आहे. परंतु, केंद्राच्या या तोडग्यावर आता राष्ट्रवादीकडून जखम पायाला आणि मलम पायाला असे म्हणत टीका करण्यात आली आहे.

कांद्याच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी फडणवीसांवर टीका केली असून, मा. फडणवीस साहेब मुळात #कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या तुम्हाला अद्यापही समजलेलीच दिसत नसल्याचे म्हटले आहे. जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय मात्र पायाला. त्यामुळे थोडा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्या असा सल्ला रोहित पवारांनी फडणवीसांना दिला आहे.

तुमच्या राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका. एकट्या नाशिक जिल्ह्यात दररोज १ लाख क्विंटल कांद्याची आवक आहे. केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार म्हणजे केवळ २० दिवसाची आवक खरेदी करणार आहे. त्यानंतर काय? खरेदीसाठी ही मर्यादा का? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! वादग्रस्त विधानानंतर धमकीचा फोन…

नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जातो तेंव्हा कांद्याचे निर्यातक्षम गुणवत्तेचे निकष असतात. या निकषाने नाफेड खरेदी करणार असेल तर बाजाराच्या सरासरी २४१० रु दरानेच खरेदी का? बाजाराच्या उच्चांकी २८०० रु प्रती क्विंटल दराने खरेदी का केली जात नाही? नाफेडकडे पडून असलेला कांदाही केंद्र सरकार विक्रीस काढणार आहे. त्यामुळं भविष्यात अजून भाव कोसळतील, याचा विचार शासनाने केला आहे का? असा प्रश्नदेखील रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

हे कुठलं धोरण?

चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्यापैकी ३० ते ४० % कांदा खराब झाला. चांगला भाव मिळाला असता तर हे नुकसान भरुन काढता आलं असतं. याचा शासनाने विचार का केला नाही? जेंव्हा कांद्याचे भाव कोसळतात तेंव्हा सरकार हस्तक्षेप करत नाही आणि आज भाव वाढण्याची केवळ शक्यता निर्माण झाली असताना सरकार हस्तक्षेप करतं, हे कुठलं धोरण? हा कुठला न्याय?

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, असे ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube