Download App

विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून मिळणार सैनिकी प्रशिक्षण, शिक्षणमंत्री भुसेंची घोषणा

इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण (Military Training) देण्यात येणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

Military Training: राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने (Department of Primary Education) एक मोठा निर्णय घेतलाय. आता शाळेत इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण (Military Training) देण्यात येणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केली आहे. नाशिकच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ठाण्यातील हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माबाबत मोठी अपडेट; ‘सर’ नावाच्या व्यक्तीशी संपर्क अन्… 

लहानपणापासूनच मुलांमध्ये राष्ट्रभावना वाढीस लागावी, यासाठी सरकारचा प्रस्ताव आहे. पहिल्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी आणि स्काउट गाईडचे टीचर प्राथमिक सैनिकी प्रशिक्ष देणार आहेत, अशी माहिती भुसेंनी दिली.

बंद दाराआड चर्चा! अजितदादा म्हणाले, कुटुंब म्हणून पवारसाहेब आणि आम्ही एकत्र… 

पुढं भुसे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना अलिकडेच सिंगापूरला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेतमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना असल्याचे शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रातही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल केले जात आहेत. शिक्षणातून देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात बदल दिसून येतील. यात पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्याचा मानस आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं भुसे म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार रुजवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाणार आहे, असं ते म्हणाले.

 

 

follow us