Download App

Ahmednagar News: पाणीप्रश्न पेटणार! विरोध…आंदोलन…तरी नगरहून आज जायकवाडीला पाणी सोडणार

Ahmednagar News: मराठवाड्याला (Marathwada) पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) अनेक आंदोलने झाली विरोध झाला मात्र आता हा पाणीप्रश्न पेटणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कारण विरोध असूनही आज मराठवाड्यासाठी नगर, नाशिकच्या धरणातून (Nashik Dam) जायकवाडीत (Jayakwadi Dam) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान आज नगर, नाशिकच्या धरणातून एकूण 8.603 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकानी आदेश काढले आहेत. दरम्यान एकीकडे मराठा आरक्षणावरून जिल्ह्यात रान पेटलेले असताना आता जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातून दरवर्षीं मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात येत असते. हे पाणी आरक्षित करण्यात येत असून मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून 31 ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. आता याच पार्श्वभूमीवर गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या धरणातून किती पाणी सोडण्यात येणार? जाणून घ्या
नगर जिल्ह्यातील मुळा (मांडओहोळ, मुळा) या धरणसमुहातून 2.10 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. तर प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) या धरणसमुहातून 3.36 टीएमसी असे एकूण 5.46 टिएमसी पाण्याचा विसर्ग हा नगरच्या धरणांमधून करण्यात येणार आहे.

फडणवीसांचा छत्तीसगड प्रचार दौरा वादात; महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याचा विरोधकांचा आरोप

तर दुसरीकडे नाशिकच्या गंगापूर धरण समुहातुन (गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी) 0.5 टिएमसीपाणी सोडावे लागणार आहे. दारणा धरण समुहातुन (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) 2.643 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. असे नाशिक च्या धरणातुन 3.143 टिएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

नगरसह नाशिकमधून विरोध
राज्यात यंदाच्या वर्षी पावसाने अनेक ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद दिला असल्याने धरण साठ्यांमध्ये पाण्याची पातळी खालावली आहे. याच जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्याने नगर जिल्ह्यासह नाशिकमधून या निर्णयाला विरोध होऊ लागला. नगरमध्ये सर्वपक्षीय बैठक देखील झाली व कोणत्याही परिस्थितीमध्ये जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. मात्र असे असताना आज नगर जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी झेपवणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नगर जिल्ह्यासह नाशिकमध्ये पाणीप्रश्न पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Tags

follow us