Download App

Gautami Patil चा धांगडधिंगा फार वर्ष चालणार नाही, तमाशा कलावंतांच्या बैठकीत मोठा निर्णय…

Gautami Patil : गेल्या काही दिवसांपासून डान्सर क्वीन म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांच्या गळ्यातली ताईत बनलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोलापुरातल्या मोडलिंब इथं आज राज्यस्तरीय तमाशा कलावंतांच्या बैठक पार पडली. या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत वसंत गाडे म्हणाले, डिजे संस्कृती नाट्यकलेला लागलेला कलंक आहे, असं म्हणत गौतमी पाटील त्यांनी फैलावर घेतलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता आहे.

काळीज पिळवटणारा व्हिडिओ! गरोदर महिलेचा आधी झोळी नंतर नदीतून ओंडक्याने प्रवास…

मोडलिंब इथं राज्यस्तरीय कलावंत, केंद्र मालक, पार्टी मालकीण, स्त्री, पुरुष कलावंतांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तमाशा केंद्रात 18 वर्षांच्या खालील मुलींना आपली कला सादर करता येणार नसल्याचा ठराव पास करण्यात आला तसेच तमाशा थिएटरमध्ये पुढील काळात डिजेचा वापर होणार नसल्याचाही ठराव पास करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना लावणी कलावंत वैशाली वाफळकर म्हणाल्या, गौतमी पाटीलचा डीजे लाऊन चाललेला धांगडधिंगा फार वर्ष चालणार नाही. त्यामुळे पुढील काळात मूळ तमाशा थिएअटरमध्ये परंपरागत लावणी शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत येणार असल्यांचं बोललं जात आहे.

ही तर सावत्रभावाची वागणूक; एमआयडीसीबाबतची बैठक रद्द होताच रोहित पवारांनी डागली तोफ

तसेच तमाशा कलावंतांना समाजामध्ये तेवढाच मान सन्मान मिळायला हवा. त्याचबरोबर या कलावंतांच्या मुलांना शिक्षण सन्मानाने घेता यावे यासाठी सरकारने आम्हाला पाठबळ देणे गरजेचे आहे, असल्याचंही वाफळकरांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यन, गौतमी पाटीलवर अश्लील हावभाव केल्याचा आरोप अनेक कलाकारांकडून करण्यात आला होता. यामध्ये अनेक तमाशा कलावंत, राजकीय नेते यांनीही तिच्यावर टीका केली होती. त्यांनंतरही गौतमीची क्रेझ कमी झाल्याचं दिसून आलं नाही. त्यानंतर गौतमीने माफी मागत अशी चूक होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर अनेकदा कार्यंक्रमांमध्ये होणाऱ्या गोंधळांमुळे गौतमी चर्चेत असते. तिच्यावर सोलापूरात गुन्हाही दाखल झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता थेट तमाशा कलावंतांनी तिच्यावर टीका केली आहे. तमाशा कलावंतांच्या टीकेवर गौतमी काय प्रत्युत्तर देणार? याकडंच सर्वांच लक्ष लागलं आहे.

Tags

follow us