Radha Patil On Case Ragister : महिलांनी साडी नेल्यावर ब्लाऊज, कंबर दिसणं सामान्यच, असा दावा करीत नृत्यांगणा राधा पाटील (Radha Patil) टीकाकारांवर चांगलीच भडकल्याची दिसून आलीयं. दरम्यान, दहिहांडी कार्यक्रमात नृत्यांगणांना नाचवल्याप्रकरणी आयोजकासह नृत्यांगणा राधा पाटीलवर टीका करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिहांडीच्या कार्यक्रमानंतर समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारीत झाले. या व्हिडिओंमध्ये नृत्यांगणांनी अश्लील डान्स केल्याचा आरोप केला जात आहे. या वादावरुन नृत्यांगना राधा पाटीलने आपली भूमिका मांडलीयं.
मोठ्या आवाजाला विरोध केला अन् जीव गेला! दिल्लीत मणिपुरी संगीत शिक्षकाची बेदम मारहाण करून हत्या
पुढे बोलताना राधा पाटील म्हणाली, महिलांच्या डान्समध्ये कंबर हलवण्याची स्टेप असतेच, लोकं आता त्यावरुनही टीका करताहेत. आम्ही किती सहन करायचं आम्हालाही काही प्रॉब्लेम आहेत. मी दहिहांडीत जो डान्स केलायं, तो मान्य आहे. पाश्चात्य डान्स करीत होतो, लावणी आणि वेस्टर्न डान्स आम्ही करीत होतो, साडी नेसल्यावर ब्लाऊज, कंबर दिसणे सामान्य आहे, मी अश्लिल हावभाव केलेले नाहीत, असं राधा पाटीलने स्पष्ट केलंय.
तसेच महाराष्ट्राचा बिहार होत असल्याचं अनेकांना वाटत असून मी माझ्या कार्यक्रमामध्ये मराठी गाण्यांवरच नाचत असते. अनेक लोकं हिंदी गाण्यावर डान्स करतात, ते लोकांना दिसत नाही. माझा मुद्दा धरला जातोयं, असंही राधा पाटीलने स्पष्ट केलंय.
दरम्यान, पाटील अडनावावरही राधा पाटीलने स्पष्टपणे भाष्य केलंय. पाटील अडनाव असल्याने मला टार्गेट केलं जात आहे का? असा सवाल करण्यात आल्यावर राधा पाटील म्हणाली, एका पाटीलने घाण केली म्हणजे दुसरीही पाटील घाण करेल का? मी अश्लिल डान्स केलेला नाही, घाणेरडी हालचाल दाखवा, म्हणत राधा पाटीलने गौतमी पाटीलला टोला लगावला आहे.
आता पोलिस परवानगीचं आम्हीच बघणार…
माझ्यावर प्रेम करणारी पब्लिक थांबणार नाही, कायदेशीर प्रोसेस करणार असून आम्ही स्वत: आता प्रमाणपत्र, पोलिस परमिशन बघणार आहोत, असं राधा पाटीलने स्पष्ट केलंय.
दरम्यान, पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये अश्लील गाण्यांवर नृत्य केल्याच्या आरोपांवरून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आणखी आठ नृत्यांगनांविरोधात पुढे पोलिसांनी कारवाई केली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या आठ नृत्यांगनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांचा देखील समावेश आहे.
