हे केवळ यश नसून संकटांशी दोन हात करण्याची शिकवण; अजित पवारांच्या वैभवीला शुभेच्छा

मस्साजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या यांची मुलगी वैभवीने नीट परिक्षेत 147 गुण मिळवले आहेत. संतोष देशमुख यांच्या

हे केवळ यश नसून संकटांशी दोन हात करण्याची शिकवण; अजित पवारांच्या वैभवीला शुभेच्छा

हे केवळ यश नसून संकटांशी दोन हात करण्याची शिकवण; अजित पवारांच्या वैभवीला शुभेच्छा

Vaibhavi Deshmukh Passed NEET : मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा नीट परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. वैभवीला नीटच्या परीक्षेत 147 गुण मिळाले आहेत. (NEET) याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीचे फोन करत वैभवीला शुभेच्छा दिल्या आहेत. नीट परीक्षा उत्तीर्ण जाल्याबद्दल वैभवीचे सर्वच स्तरातून कैतुक होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

बारावी परीक्षेनंतर कु. वैभवी संतोष देशमुख हिने मेडिकलसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या NEET सारख्या कठीण परीक्षेत मिळवलेलं घवघवीत यश केवळ शैक्षणिक कामगिरी नाही, तर संकटांशी दोन हात करत ध्येयाला भिडण्याची शिकवण आहे. जी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.

काय सांगता! गुगल देणार AI चे धडे तेही मोफत; घरबसल्या करता येणारे कोर्स होणार सुरू

वैभवी, तुझं यश केवळ गुणांच्या रूपात मोजता येणारं नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही तू खचली नाहीस, डगमगली नाहीस. दुःख पचवून, संयम आणि मेहनतीच्या जोरावर तू स्वतःचं स्वप्न जपलं आणि ते पूर्णत्वाकडे नेलं. ही जिद्द, ही चिकाटी आणि ही समजुतदारी खरंच वाखाणण्याजोगी आहे. तुझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!

सुप्रिया सुळे यांच्याही शुभेच्छा

मस्साजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या यांची मुलगी वैभवीने नीट परिक्षेत 147 गुण मिळवले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कठिण काळात वैभवीने ही परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेमध्ये वैभवी ने 85.33 टक्के इतके गुण मिळवले होते. दरम्यान या वैभवीच्या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करुन अभिनंदन केले आहे. तसेच ट्वीटरवर देखील एकपोस्ट करत वैभवचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version