काय सांगता! गुगल देणार AI चे धडे तेही मोफत; घरबसल्या करता येणारे कोर्स होणार सुरू

Google Free AI Course : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलने एक खास निर्णय घेतला आहे. कंपनीने फ्री AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कोर्स सुरू (Google Free AI Course) केले आहेत. या कोर्सचे शिक्षण कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. कोर्स शिकताना कोणतीही अडचण येणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवाराला गुगल एक प्रमाणपत्रही देणार आहे. यामुळे उमेदवाराला जॉब मिळण्यात मदत होईल.
कोणते AI कोर्स अगदी फुकट
जेनरेटिव्ह AI : या कोर्समधून जेनरेटिव्ह AI नक्की काय आहे याची माहिती देण्यात येईल. ChatGPT किंवा असे AI जे नवीन कंटेंट तयार करतात ते कसे काम करतात आपल्या रोजच्या कामात त्याचा वापर कसा करता येईल याची माहिती मिळणार आहे. हा कोर्स अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील आहे. या कोर्सचा कालावधी फक्त एक तासाचा आहे. जे लोक AI च्या दुनियेत पहिलं पाऊल टाकू इच्छितात त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे.
मेसेजिंग, पेमेंट अन् डेटिंग होणार एकत्र, Elon Musk लॉन्च करणार XChat; जाणून घ्या भन्नाट फीचर्स
AI मॉडेल कसे काम करतात
AI मॉडेल नेमकं कसं काम करतात, प्रॉम्प्ट कसे लिहिले जातात, म्हणजेच AI कडून काम करुन घेण्यासाठी योग्य प्रश्न कसे विचारले पाहिजेत, AI चा वापर जबाबदारीने कसा करावा या सर्व गोष्टी कोर्समध्ये शिकता येतील. AI जनरेटिवचे बारकावे समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना याचा नक्कीच फायदा होईल. त्यादृष्टीनेच या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.
जर तुमचा एखादा लहान मोठा व्यवसाय असेल किंवा भविष्यात एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर कोर्समधून मदत मिळेल. AI टू्ल्सचा वापर करुन तुम्ही तुमचं काम कसं सोपं करु शकता याची माहिती कोर्समधून मिळेल. या स्किल्सच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांशी कनेक्ट होऊ शकता तसेच बिजनेस आणखी पुढे घेऊन जाऊ शकता.
कोर्सची माहिती कुठे मिळेल..
या कोर्सना तु्म्ही सरळ गुगलच्या AI लर्निंग वेबसाइटवर शोधू शकता. ai.google/learn-ai-skills/ किंवा grow.google/ai/ या वेबसाइट्सना भेट देऊन सर्व एआय कोर्सची माहिती घेऊ शकता.
कसा सुरू कराल कोर्स
ज्यावेळी तु्म्ही वेबसाइटवर जाल त्यावेळी तुम्हाला विविध कोर्स दिसतील. जो कोर्स तुम्हाला करायचा आहे त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला Learn more किंवा Get Started यांसारखे बटन दिसेल. त्यावर क्लिक करा. काही कोर्स Coursera यांसारख्या वेबसाइट्सवर होस्ट केले आहेत. येथे जाऊन तुम्हाला एक अकाउंट तयार करावे लागेल. Coursera वर कोर्ससाठी एनरोल करताना तुम्हाला Audit Mode किंवा Free Enrollment पर्यायाची निवड करावी लागेल. यामुळे तुम्हाला कोर्सचा सर्व व्हिडिओ कंटेंट, रिडिंग मटेरियल आणि जास्तीत जास्त क्विज कोणत्याही शु्ल्काशिवाय मिळतील.