फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात! मोबाईल नंबर आणि वैयक्तिक माहिती लीक… ‘हे’ महत्त्वाचे काम लगेच करा

Facebook Users Data In Danger : फेसबुक वापरणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 1.2 अब्ज वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा लीक झाला आहे, ज्यामध्ये मोबाईल (Mobile) नंबर, नाव, पत्ता, जन्मतारीख, (Facebook Data) शहर आणि देश यासारखी माहिती समाविष्ट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा डेटा डार्क वेबवर विकला जात (Social Media) आहे. यासाठी एक सायबर हॅकर जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. ज्याने स्वतःला बाइटब्रेकर म्हटलंय.बाइटब्रेकरने दावा केलाय की, त्यांनी फेसबुकच्या (Facebook) एका फीचरमधील त्रुटीचा फायदा घेऊन ही माहिती गोळा केली आहे. परंतु काही सायबर तज्ञांचा असा विश्वास आहे की, त्याच्याकडे तेवढा डेटा नसेल. दुसरीकडे, मेटा (फेसबुकची मूळ कंपनी) ने स्पष्ट केलंय की, हा नवीन डेटा उल्लंघन नाही, तर 2021 मध्ये झालेल्या जुन्या डेटा लीकशी संबंधित माहिती आहे. ज्यामध्ये सुमारे 50 कोटी वापरकर्ते प्रभावित झाले होते.
मंत्र्यांना शेती, कृषी नको…मलाईदार खाती हवीत, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
या घटनेत ज्या तंत्राचा उल्लेख केला जात आहे, त्याला वेब स्क्रॅपिंग म्हणतात. ही एक स्वयंचलित प्रक्रिया आहे. ज्यामध्ये बॉट्सच्या मदतीने वेबसाइटवरून मोठ्या प्रमाणात माहिती काढली जाते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, ते कॉपी-पेस्टसारखे आहे, परंतु मशीनद्वारे. अहवालानुसार, लीक झालेल्या डेटाद्वारे कोणत्याही वापरकर्त्याची ओळख सहजपणे उघड केली जाऊ शकते.
मोठी बातमी! बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला पुन्हा अटक; थेट दिल्लीतून घेतलं ताब्यात
मेटाने म्हटले आहे की ज्या डेटाबद्दल चर्चा केली जात आहे, तो 2021 मध्येच लीक झाला होता. आता कोणताही नवीन लीक झालेला नाही. पण जर बाईटब्रेकरचा दावा खरा ठरला, तर सोशल मीडियाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी डेटा चोरी ठरू शकते. तज्ञांनी वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचा. वेळेत सायबर सुरक्षेचे उपाय करण्याचा सल्ला दिला आहे. डेटा सुरक्षेच्या या युगात, सतर्क राहणे हे सर्वात मोठे शस्त्र आहे, अशी माहिती एबीपीच्या हवाल्याने मिळत आहे.