Gmail वापरकर्त्यांनो सावधान! Gemini AI टूलद्वारे होऊ शकते तुमच्या पासवर्डची चोरी

Gmail वापरकर्त्यांनो सावधान! Gemini AI टूलद्वारे होऊ शकते तुमच्या पासवर्डची चोरी

Google Gemini AI : जर तुम्ही जीमेल (Gmail) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी एक नवीन जीमेल घोटाळा उघड केला आहे. यामध्ये स्कॅमर गुगल जेमिनी एआय (Google Gemini AI) टूलचा गैरवापर करत आहेत. या घोटाळ्याचा उद्देश वापरकर्त्यांचे जीमेल पासवर्ड आणि अकाउंट डिटेल्स चोरणे हा आहे.

जीमेलचा जेमिनी घोटाळा काय आहे?

गुगलचा जेमिनी हा एक एआय (AI) टूल आहे. जो जीमेल सारख्या ॲप्लिकेशनमध्ये साइडबारद्वारे इंटीग्रेट होतो. जेमिनी एआय टूल जीमेलमध्ये ईमेलचा सारांश देणे, कॅलेंडर अपडेट करणे आणि वापरकर्त्याला स्मार्ट उत्तरे देण्यास मदत करणे अशी कामे करतो. परंतु आता हॅकर्स वापरकर्त्यांना फसवण्यासाठी या टूलचा वापर करत आहेत.

सायबर सुरक्षा तज्ज्ञ मार्को फिगुएरोआ यांच्या मते स्कॅमर अशा ईमेलमध्ये लपवलेले प्रॉम्प्ट (एआय सूचना) टाकतात जे दिसत नाहीत. हे प्रॉम्प्ट ईमेलमध्ये HTML आणि CSS द्वारे पांढऱ्या रंगात आणि शून्य फॉन्ट आकारात टाकले जातात जेणेकरून ते वापरकर्त्याच्या नजरेपासून लपलेले राहतील.

UPI वापराबाबत मोठी अपडेट; आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्राचं सूचक वक्तव्य

क्रोनोलॉजी समजून घ्या..

जेव्हा वापरकर्ता असा मेल उघडतो आणि जेमिनीला सारांश तयार करण्यास सांगतो तेव्हा एआय टूल या लपलेल्या सूचना वाचतो आणि एक बनावट चेतावणी तयार करतो. या चेतावणीत असे म्हटले जाते की तुमचे जीमेल खाते हॅक झाले आहे. त्यात एक बनावट ग्राहक सेवा क्रमांकही देण्यात येतो. वापरकर्त्याने त्या नंबरवर कॉल केला तर स्कॅमर वापरकर्त्याला संवेदनशील खात्याची माहिती देण्यास भाग पाडू शकतात.

जीमेल घोटाळ्यापासून कसे वाचायचे?

सुरक्षा तज्ज्ञांनी अशा घोटाळ्यांपासून जीमेल वापरकर्त्यांना संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. वापरकर्त्यांनी अज्ञात ईमेलमधील लिंक्सवर क्लिक करू नका.

वेबसाइटची यूआरएल (URL) लिंक नेहमी काळजीपूर्वक तपासा. खरी जीमेल URL अशी आहे: https://mail.google.com

जर कोणताही ईमेल संशयास्पद वाटला तर तो ‘रिपोर्ट फिशिंग’ द्वारे त्वरित कळवा. तुमचा जीमेल पासवर्ड वारंवार बदलत रहा. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) वापरा. यामुळे तुमच्या खात्याची सुरक्षा दुप्पटीने वाढेल.

1.8 अब्ज जीमेल वापरकर्ते धोक्यात

जीमेलच्या जेमिनी घोटाळ्यांसारख्या स्कॅमचा परिणाम मोठा असू शकतो. कारण जीमेलचे जगभरात 1.8 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. जीमेलचा वापर कार्यालयीन कामांव्यतिरिक्त महत्त्वाची व संवेदनशील माहिती पाठविण्यासाठीही केला जातो. गुगलला याबद्दल माहिती देण्यात आली आहे. परंतु जोपर्यंत गुगलद्वारे सुरक्षा अद्ययावत करून पूर्णपणे लागू केली जात नाही तोपर्यंत वापरकर्त्यांची दक्षता हे या स्कॅमविरोधातील सर्वांत मोठे शस्त्र आहे.

Realme 15 Pro 5G भारतीय बाजारात लॉन्च, 7000 एमएएच बॅटरी, AI फीचर्स अन् किंमत फक्त…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube