Dcm Ajit Pawar News : “आज माझ्याकडे अर्थखातं आहे, त्यामुळं झुकतं माप मिळतं, पुढे अर्थखातं टिकेल की नाही, सांगता येत नाही”, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांसह(Ajit Pawar) समर्थकांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्रिपदेही मिळाली, त्यानंतर आता अजित पवार(Ajit Pawar) यांनी हे विधान केल्याने त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीयं. बारामतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहकार संस्था आणि कारखान्यांसंदर्भात बोलताना अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
“Brij Bhushan Sharan Singh यांनी एकही संधी सोडली नाही” : पोलिसांचा कोर्टात खळबळजनक दावा
अजित पवार म्हणाले, आज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही टिकेल, सांगता येत नाही. मला या विषयावर काही बोलायचे नाही. मला विकासाबद्दल विचारा. मी विकासासाठी बैठका घेतोय. माझे ध्येय फक्त विकास एके विकास एवढचं असं अजित पवार म्हणाले आहेत.
नागालँडचे आमदार मुंबईत येणार; अजितदादांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय शक्तिप्रदर्शन
तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संसदेतील भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन अजित पवार यांनी सवाल करण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी हे विधान केलं आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी प्रफल्ल पटेल आणि शरद पवार यांच्याविषयी बोलणं टाळणंच पसंद केलं आहे.
Sharad Pawar : पवारांनी गुजरात गाठलं, थेट अदानींच्या घरी दाखल; खास भेटीची चर्चा तर होणारच!
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामिल झाल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंपच झाल्याचं बोललं जात होतं. त्यानंतरही अजित पवार यांच्यावर भाजपच्या आमदारांकडून खालच्या भाषेत टीका केली जात आहे, त्यावरुन सत्ताधारी पक्षात अजितदादांची धुसमट होतेयं, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बंददाराआड चर्चेसाठी अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
अजित पवार यांच्या विधानावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं असून अजित पवार नाराज आहेत की, नाही? ते मला कसं माहिती असणार? भापजसोबत गेल्यावर त्यांच्यावर काय अन्याय होतो, य़ावर भाष्य करणं हे मला योग्य वाटत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. भापजसोबत अजित पवार स्वखूशीने गेले आहेत. त्यांमुळं त्यांच्यावर काय अन्याय होतो? काय नाही, याचा त्यांनी; अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि ते करतील, अजित पवार सावध आहेत, याचा मला समाधान असल्याची उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.