नागालँडचे आमदार मुंबईत येणार; अजितदादांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय शक्तिप्रदर्शन

नागालँडचे आमदार मुंबईत येणार; अजितदादांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय शक्तिप्रदर्शन

मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार गट) नागालँडचे दोन आमदार येत्या सोमवारी (25 सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दर्शविल्यानंतर हे आमदार पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट देणार आहेत. याशिवाय प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, या निमित्ताने महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन केल्यानंतर अजित पवारांचे पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर शक्तिप्रदर्शन होणार आहे. (Two MLAs from NCP (Ajit Pawar group) Nagaland are coming on Monday to visit Maharashtra)

राष्ट्रवादीची महाराष्ट्राशिवाय केरळ, गुजरात, गोवा, झारखंड या राज्यांमध्ये लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत किंवा यापूर्वी आले होते. यावर्षीच्या मार्च महिन्यात नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आश्चर्यकारकरित्या 7 आमदार निवडून आले. यानंतर तेवढ्याच आश्चर्यकारकपणे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या आमदारांची ताकद नागालँडमधील सत्ताधारी एनडीए आघाडीच्या मागे उभी केली.

Adani Group : शिंदे सरकारकडून अदानी समुहाला मोठे कंत्राट, मुंबई, पुणे अन् बारामतीमध्ये होणार काम

मात्र त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ झाली. महाराष्ट्रात अजित पवार यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला शरद पवार यांच्यापासून वेगळे होत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यांना राष्ट्रवादीतील सुमारे 40 आमदारांनीही पाठिंबा दिला. याशिवाय शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणाऱ्या खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनीही अजित पवार यांना साथ दिली. त्यानंतर 20 जुलै रोजी नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सर्व सात आमदारांनीही अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला.

अमित शाह मुंबईत! शिंदे-फडणवीसांसोबत बंद दाराआड खलबत; अजितदादांच्या अनुपस्थितीने गाजला दौरा

नागालँडच्या आमदारांचा अजितदादांना पाठिंबा :

नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वानुंग ओडिओ यांच्या नेतृत्वात सर्व आमदारांनी नवी दिल्लीत येऊन खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. यावेळी एका पत्रकाच्या माध्यमातून अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला होता. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संपूर्ण राज्य कार्यकारिणी आणि जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी सखोल चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर, नागालँडमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असं या पत्रकात म्हंटलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube