Download App

लंडनमध्ये मराठीजनांना मिळणार स्वतःच्या मालकीचे ‘महाराष्ट्र भवन’, 5 कोटींचा निधी मंजूर; DCM अजित पवारांची माहिती

लंडनमधील मराठीजनांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारने तिथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला,

  • Written By: Last Updated:

Maharashtra Bhavan in London : लंडनमधील (London) मराठीजनांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) तिथे ‘महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवा (Ajit Pawar) यांनी दिली. लंडनमधील मराठीजणांना स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र मिळावे, ही अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे. हे भवन मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरांचे जतन आणि प्रचार करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जम्मू आणि काश्मीरमधून मोठी बातमी! वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर भूस्खलन भाविकांना थांबवलं 

‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
परदेशात मराठी संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हे भवन उभारले जाणार आहे. यामुळे लंडनमधील मराठीजनांना सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी एक भव्य जागा उपलब्ध होईल. तसंच मराठी सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, आणि सामाजिक एकत्रीकरणाला चालना मिळू शकते. याबाबत अजित पवार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत लिहिलं की, महाराष्ट्र शासनातर्फे लंडनमधील मराठीजनांना गणेशोत्सवानिमित्त सुंदर भेट.. महाराष्ट्र भवनाच्या रूपानं मराठीजनांना लंडनमध्ये स्वतःच्या मालकीचं सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र मिळणार..! लंडनमधील मराठीजनांना आपल्या हक्काचं आणि स्वतःच्या मालकीचं सांस्कृतिक भवन मिळावं, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करुन तिथं ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

पुढं त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्र भवन हे युनायटेड किंगडम आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. या भवनामुळे मराठी साहित्य, नृत्य, संगीत आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारत व युनायटेड किंगडम यांच्यात सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना मिळेल. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भाषा वर्ग, कार्यशाळा तसंच आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करता येईल. यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो, असं अजित पवारांनी म्हटलं.

राज्यात पुन्हा धो धो पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; जाणून घ्या सर्वकाही 

दरम्यान, महाराष्ट्र भवनात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह, सभा कक्ष, आणि इतर सुविधांचा समावेश असेल. याशिवाय, मराठी भाषा आणि संस्कृती यांचा प्रचार करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार असून अजित पवारांनी या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

मराठी समाजाला एकत्र आणणारे आणि सांस्कृतिक वारसा जपणारे हे केंद्र परदेशात महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरांचे प्रतीक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

लंडनमधील महाराष्ट्र मंडळाने केले स्वागत…
लंडनमधील महाराष्ट्र मंडळाने या घोषणेचे स्वागत केले असून, गणेशोत्सवासारखे सण मोठ्या उत्साहाने साजरे करण्यासाठी या भवनाचा उपयोग होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

follow us