Devendra Fadnavis Will Decide To Give Ticket In Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेतृत्वाने राज्यात सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर सोबवल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत जागावाटपाचा निर्णय स्वत: देवेंद्र फडणवीस त्यांच्या पातळीवर घेणार आहेत. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकीय आखाड्यात कुणाला उतरवायचे कुणाला घरी बसवायचे याचा अंतिम निर्णयदेखील देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. विधानसभेसाठी भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. रविवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.
फडणवीस सरकारमधून बाहेर पडणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळेंनी एका वाक्यात विषय संपवला
विधानसभेसाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचे अधिकार देण्यात आले आहेत. तर मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या याचे सर्व अधिकारही भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीतून समोर येत आहे. भाजपच्या कोअर कमिटीची एक बैठक पार पडली. या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जागावाटप जागांची निश्चिती बैठकीत ठरला आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली असल्याचेही शेलार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस सीबीआयचे डायरेक्टर आहेत का? वाझेंचा उल्लेख करत अंंधारेंचा हल्लाबोल
भाजपने घेतलेल्या निर्णयानंतर आता महायुतीत भाजपने किती जागा लढवायच्या याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांना घेता येणार आहे. यासोबत मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना सोपवले असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजपची यादी जाहीर केली जाणार आहे. तर, मित्र पक्षांचा योग्य आदर राखला जाईल, असं एकमत बैठकीत झालं आहे.
भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप वरिष्ठांनी घेतली आहे. राज्यातील संपूर्ण 288 जागांवर संघटनेच्या मंडल युनिटवर राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदन असे पारित करून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे आणि त्यामध्ये जनसहभाग करणे याचा पंधरा दिवसांच्या पुढचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला, असे आशिष शेलार म्हणाले.