Download App

नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 14 जणांचा मृत्यू; हेल्पलाईन नंबर्स जारी; काय म्हणाले फडणवीस?

नेपाळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसला (Nepal Bus Accident)झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Written By: Last Updated:

Nepal Bus Accident : नेपाळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसला (Nepal Bus Accident)झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या प्रवाशांपैकी 14 जण जळगाव जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात असून, मदत आणि माहितीसाठी नेपाळमधील भारतीय दुतावासाकडून (Indian Embassy in Nepal) हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi: छोट्या पुढारीची अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट; म्हणतोय, ‘मला जाऊ द्याना…’ 

 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रणगाव, पिंपळगाव, तळवेल, या गावातले सर्व भाविक होते. घटनेची माहिती मिळताच गावात अतिशय शोकाकूल वातावरण आहे. गावातील भाविक हे 16 ऑगस्टपासून अयोध्या नेपाळ काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते. 16 ते 28 ऑगस्टपर्यंत असा यांचा प्रवास होतो. मात्र, तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत त्यांची बस कोसळली. या अपघातात 16 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

पुण्यात रक्ताचा थरार, दारूवरून वाद अन् हातोड्याने वार, सराईत गुंडाची निर्घृण हत्या 

मृतांचे पार्थिव मूळगावी आणण्यासाठी प्रयत्न सुरू
दरम्यान, या घटनेबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले की, नेपाळमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करत करतो, असं फ़डणवीस म्हणाले. तसचे जळगावहून संबंधित अधिकारी नेपाळला जाणार असून, मृतांचे पार्थिव मूळगावी आणण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत, असही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, नेपाळमधील भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांशी मदत आणि बचाव कार्यात समन्वय साधत आहे. दूतावासाने +977-9851107021 हा आपत्कालीनं नंबर देखील जारीकेला.

कसा झाला अपघात?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यूपी एफटी 7623 पासिंग नंबर प्लेट असलेली बस पोखराहून काठमंडूकडे निघाली होती. त्यावेळी अचानक तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली. सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू करून अपघातग्रस्तांना नदीतून बाहेर काढण्यात आले. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत 16 जणांपैकी 14 जण जळगावमधील आहेत.

follow us