Bigg Boss Marathi: छोट्या पुढारीची अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट; म्हणतोय, ‘मला जाऊ द्याना…’
Bigg Boss Marathi New Season Day 27 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरातील रंगतदार गोष्टी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. घरातील सदस्य टास्कदरम्यान भांडणं करत असले तरी एकमेकांसोबत मजा-मस्ती करायला त्यांना आवडते. (Bigg Boss Marathi New Season ) तसेच त्यांची मजा-मस्ती पाहणं प्रेक्षकांच्यादेखील पसंतीस उतरत असतं. अशाप्रकारे आजच्या भागात छोटा पुढारी (Chota Pudhari) अरबाजला (Arbaz Patel) एक छोटीशी रिक्वेस्ट करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या नवा प्रोमो खूपच गंमतीशीर आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या प्रोमोमध्ये छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करत म्हणतोय,”अंघोळीला लवकर जा म्हणतोय तरी जात नाहीस”. छोटा पुढारीला उत्तर देत अरबाज म्हणतो,”नाही जाणार मी अंघोळीला… माझी अंघोळ झाल्यानंतरच तू जायचं अंघोळीला”. त्यावर घन:श्याम म्हणतोय,”स्वत:ही जात नाहीस आणि मलादेखील जाऊ देत नाही”. पुढे अरबाज आणि छोटा पुढारीच्यामध्ये पडत सूरज म्हणतो,”तुमच्या नादात खूप वेळ वाया जातोय”. त्यानंतर अरबाज अंघोळीला जातो. दरम्यान छोटा पुढारी म्हणतो,”माझा भाऊ करुदेतना आम्हाला अंघोळ”. पुढे अरबाज त्याला प्रश्न विचारतो,”आता कसं वाटतंय”.
अरबाज आणि घन:श्याम अनेकदा एकमेकांसोबत धमाल करताना दिसून येतात. त्यांची ही धमाल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते. आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांचा हा गंमतीशीर अंदाज पाहायला मिळणार आहे.
डीपीने निक्कीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत घातलं गाऱ्हाणं
आजच्या भागात निक्कीच्या वाढदिवसानिमित्त (Nikki Tamboli Birthday ) डीपी दादांनी (DP Dada) खास गाऱ्हाणं घातलेलं पाहायला मिळणार आहे. निक्कीला शुभेच्छा देत डीपी दादा म्हणत आहेत, (Bigg Boss Marathi New Promo) “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. 75 वर्षे जग.. तुझं असचं तारुण्य टिकूदेत. लोकांना छळू नकोस. त्यांना त्रास देऊ नकोस. लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक. पण कोणाला काही मानसिक त्रास देऊ नकोस. तुला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा…शुभेच्छूक साधासुधा एक पलिकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस”.
Bigg Boss Marathi : डीपीने निक्कीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत घातलं गाऱ्हाणं
आजच्या भागात निक्की डीपी दादांना सांगते,”मला वीट आलाय. माझा सर्वोत्कृष्ट वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी ‘बिग बॉस’ला धन्यवाद म्हणते. माझे डोळे उघडलेत. टॉपला जायचं तर एकत्र जाऊयात. मी एखाद्याला निवडलं ना तर त्याच्यासाठी मी सर्वांसोबत लढू शकते. पण समोरच्याला या गोष्टी कळल्या पाहिजेत. अभिजीत मला समजून घेतो”. एकंदरीतच निक्कीला अभिजीतचा प्रचंड राग आलेला आहे. याबद्दल घरातील इतर सदस्यांकडे ती व्यक्त होताना दिसून येते.