Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यात उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अडथळा निर्माण करतात, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) अनेकदा केला. तर आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार केलं जाऊ शकतं, असा आरोप जरागेंनी केला होता. यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.
अभिनंदन बाबा! तिकीटासाठी एकदाही दिल्लीला न जाता…; संभाजीराजेंची शाहू महाराजांसाठी भावनिक पोस्ट
आज देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, त्यांना जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपाविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले, राज्यात आमचे अनेक हितचिंतक आहेत. ते हितचिंतक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन त्यांना काहीतरी सांगत असतात. त्यानुसार जरांगे पाटील बोलतात. असं कुणालाही तडीपार केलं जात नाही. तडीपार करण्यासारखे त्यांच्यावर खटले दाखल आहेत का? तर तसं अजिबात नाही. मात्र, अनेकजण वाहत्या गंगेत हातू धूऊन घेत असून ते पाटलांना मिसगाईड करत आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला.
लष्कर आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’मुळे बुरहानला नवे जीवन, शाळेतही परतला
फडणवीस पुढे म्हणाले, वाहत्या गंगेत अनेकजण हात धुवून घेण्याचं काम करत असतात. अशी लोक जरांगे पाटील यांना काहीतरी सांगत आहेत. जरांगे पाटील आणि आंदोलकांवर ज्या केसेस दाखल आहेत, त्या मागे घेतल्या जाणार नाहीत. ज्या ठिकाणी जाळपोळ, तोडफोड झाली, पोलिसांवर हल्ला झालेला आहे, अशा केसेस परत घेणं शक्य होणार नाही. मात्र, इतर केसेस परत घेण्याची घोषणा करून त्यावर कामही सुरू केलं आहे.
फडणवीस म्हणाले, सध्या 24 जिल्ह्यांमध्ये तपासावर असलेल्या 492 केसेस आहेत. त्याची छाननी सुरू झाली आहे. 172 केसेस परत घेण्यासंदर्भात शिफारसही दिली आहे. सहा केसेस मागे घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. उर्वरित केसेसची छाननी सुरू आहे. सध्या आचारसंहिता लागू आहे. या काळात छाननी पूर्ण करून आचारसंहिता संपताच त्या केसेस मागे घेतल्या जातील. केसेस मागे घेण्यासाठी संबंधित लोकांना जबाबासाठी पुन्हा बोलवावे लागते. ही एक कायदेशीर प्रक्रिया असून ही प्रक्रीय पूर्ण करावीच लागेत. पण, जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले तरी नवीन केस दाखल झली, असं सांगितलं जातं. मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात.
सगेसोयरे शब्द असेल किंवा केसेस मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची घोषणा असेल ती अंतिम आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर कुणीही नाही. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असून त्यांच्या निर्देशावर पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे, असं फडणवीस म्हणाले.