‘अमरावतीच्या जागेवर भाजपकडून नवनीत राणा…; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान…

‘अमरावतीच्या जागेवर भाजपकडून नवनीत राणा…; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान…

Devendra Fadnvis On Navneet Rana : आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जाहीर होताच सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीसांनी एक मोठं विधान केलं आहे. अमरावती लोकसभा जागेबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणार की नाही? याबाबत अस्पष्टता असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अमरावतीची जागा भाजपचं लढवणार असून नवनीत राणांबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

दारूण पराभव समोर दिसत असल्याने बाळराजे गायब; भाजपचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमरावती लोकसभा भाजप लढणार असून अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा पाच वर्षे भाजपसोबत राहिल्या आहेत. नवनीत राणा मोठ्या ताकदीने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Thalapathy Vijay: अभिनेता थलपथी विजयच्या गाडीवर दगडफेक, व्हिडिओ व्हायरल

आमदार रवी राणांकडून फडणवीसांना चिठ्ठी :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं आहे. स्वागत केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक चिठ्ठी दिली आहे. ही बाब माध्यमांकडून कॅमेरॉत कैद करण्यात आली आहे. त्यामुळे आता या चिठ्ठीत नेमंक काय? हा सवाल उपस्थित केला जात आहे.

अमरावती लोकसभा‎ मतदारसंघात कोणत्याही पक्षाने‎ उमेदवार जाहीर केला नाही.‎ दरम्यान विद्यमान खासदार नवनीत ‎राणा यांनी शनिवारी युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.‎ यावेळी त्यांनी लोकसभा‎ निवडणुकीबाबत भूमिका जाहीर‎ करताना सांगितले की, मी युवा‎ स्वाभिमान पक्षाची कार्यकर्ती आहे, त्यामुळे आमचा पक्ष जो‎ निर्णय घेईल, तो मान्य आहे.‎ आम्ही (युवा‎ स्वाभिमान पक्ष) एनडीएचे घटक पक्ष‎ आहोत. त्यामुळे आमचे नेते नरेंद्र मोदी,‎ अमित शाह, देवेंद्र फडणवीस जो आदेश‎ देतील, त्या आदेशाचे आम्ही‎ पालन करणार असल्याच नवनीत राणा यांनी जाहीर केलं होतं.

दरम्यान, अमरावती लोकसभा आणि नवनीत राणा यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे. आता अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा लढणार की नाही? हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज