Mirzapur 3: तीन वर्षांनंतर चाहत्यांना पुन्हा ‘गुड्डू भैय्या’ची झलक दिसणार, शेअर केला व्हिडिओ…

Mirzapur 3: तीन वर्षांनंतर चाहत्यांना पुन्हा ‘गुड्डू भैय्या’ची झलक दिसणार, शेअर केला व्हिडिओ…

Mirzapur Season 3 Teaser: ‘ ‘मिर्झापूर’ ही वेब सीरिज आहे, जी भारतात ओटीटीसाठी (OTT ) एक मोठा ब्रेक ठरली आहे. या सीरिजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे आणि त्यामुळेच चाहते तिच्या तिसऱ्या सीझनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. ( Mirzapur Season ) ‘मिर्झापूर’चा दुसरा सीझन 2020 मध्ये आला आणि प्रेक्षकांना देखील तो खूप आवडला होता. आता गेल्या तीन वर्षांपासून चाहते ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)


‘मिर्झापूर सीझन 3’ ची घोषणा झाल्यापासून, प्रेक्षक पुन्हा एकदा गुड्डू भैया आणि कालिन भैयाची झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. मात्र आता त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. खरं तर, आज 19 मार्च 2024 रोजी, ‘मिर्झापूर सीझन 3’ चा मोस्ट अवेटेड टीझर रिलीज होणार आहे.याबाबत निर्माते आज सीरिजच्या रिलीजची तारीख देखील जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अली फजलने इशारा दिला

ॲमेझॉन प्राइमच्या ‘मिर्झापूर 3’ या वेब सीरिजमध्ये गुड्डू भैय्याची भूमिका साकारणारा अभिनेता अली फजलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे अलीने ‘मिर्झापूर 3’शी संबंधित काही खास घोषणा करण्याची हिंट दिली आहे. व्हिडिओमध्ये, अली आरशात पाहताना स्क्रिप्ट वाचतो आणि म्हणतो की, ‘सुरुवातीला मी मजबुरीने हे केले, आता मला मजा येत नाही. मजबुरीतून सुरुवात केली, आता आणखी मजेशीर होणार आहे. तुम्ही तयार आहात ना, उद्या 29 मार्चला सर्व काही होणार आहे.

अली फजलने व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे सुरू झाले आहे, ‘तुम्ही तयार आहात का?’ उद्या काहीतरी येत आहे, उद्या काहीतरी घडत आहे. उद्यापासून एक बंपर सेलिब्रेशन सुरू होणार आहे.

Thalapathy Vijay: अभिनेता थलपथी विजयच्या गाडीवर दगडफेक, व्हिडिओ व्हायरल

‘मिर्झापूर सीझन 3’ची स्टारकास्ट

चाहत्यांना यावर्षी जूनमध्ये ॲमेझॉन प्राइमवर ‘मिर्झापूर’चा तिसरा सीझन पाहता येणार आहे. ‘मिर्झापूर सीझन 3’ मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि ईशा तलवार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube