Thalapathy Vijay: अभिनेता थलपथी विजयच्या गाडीवर दगडफेक, व्हिडिओ व्हायरल

Thalapathy Vijay: अभिनेता थलपथी विजयच्या गाडीवर दगडफेक, व्हिडिओ व्हायरल

Thalapathy Vijay Viral Video: साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय (Thalapathy Vijay ) सध्या त्याच्या आगामी ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (The Greatest of All Time Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. ( Viral Video) सध्या अभिनेता चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूपच व्यस्त आहे. आता तो चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी केरळला (Kerala) पोहोचला आहे.


दरम्यान, सुपरस्टारशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये चाहते त्यांच्या आवडत्या स्टारचे भव्य स्वागत करताना दिसत आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत, यामध्ये आश्चर्यकारक म्हणजे त्याच्या गाडी भोवती लोकांमध्ये वेडेपणा पाहायला मिळत आहे.

अभिनेत्याच्या गाडीची तोडफोड

लोकांनी अभिनेत्याच्या गाडीला चारही बाजूंनी घेरले असून विजयचे फुलांनी स्वागत केले जात असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यादरम्यान थलपथी विजय यांच्या आलिशान कारचेही नुकसान झाले. मात्र, या कालावधीत थलपथी विजयला कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण तो ज्या गाडीत बसला होता त्या कारचे काच तुटल्याचे दिसत आहे.

त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. थलपथी विजय 14 वर्षांनंतर केरळमध्ये परतले आहेत. सध्या लोकांचे त्याच्या आवडत्या स्टारला पाहून नियंत्रण सुटल्याचे दिसत आहेत.

Dabangg 4: चुलबुल पांडेच्या भूमिकेत भाईजान पुन्हा दिसणार, अरबाज खानने ‘दबंग 4’ बद्दल दिली हिंट

चित्रपटाचे पोस्टर अप्रतिम

काही काळापूर्वी विजयने त्याचा नवीन चित्रपट GOAT ची घोषणा केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रभुदेवा, प्रशांत आणि अजमल दिसणार आहेत. विजयने नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले होते. मात्र, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube