Dabangg 4: चुलबुल पांडेच्या भूमिकेत भाईजान पुन्हा दिसणार, अरबाज खानने ‘दबंग 4’ बद्दल दिली हिंट

Dabangg 4: चुलबुल पांडेच्या भूमिकेत भाईजान पुन्हा दिसणार, अरबाज खानने ‘दबंग 4’ बद्दल दिली हिंट

Dabangg 4: चुलबुल पांडे (Chulbul Pandey) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमान खानच्या (Salman Khan) दबंग (Dabangg) फ्रँचायझीच्या चौथ्या भागाबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे, जे ऐकल्यानंतर चाहत्यांना मोठा आनंद होणार आहे. सलमान खान लवकरच ‘दबंग 4’ (Dabangg 4) घेऊन येणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने (Arbaaz Khan) याला दुजोरा दिला आहे.

चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान खान पुनरागमन करणार

‘मिड-डे’शी बोलताना अरबाजने ‘दबंग 4’ बाबत हिरवा कंदील दिला आहे. तो म्हणाला की, ‘सध्या मी आणि सलमान दोघेही आपापल्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहोत. मात्र सलमान खानला पुन्हा एकदा चुलबुल पांडेची भूमिका करायची आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही चित्रपटाची घोषणा करू आणि त्यानंतर शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती अभिनेत्यांनी दिली आहे.

अरबाज खानने खुलासा केला

सलमान आणि अरबाजने ‘दबंग 4’ च्या संदर्भात ‘जवान’ दिग्दर्शक एटली यांची भेट घेतली होती. आता मिड डेशी बोलताना अरबाजने या बातम्यांचे पूर्णपणे खंडन केले आहे. ते म्हणाले की, ‘मी ऍटले यांना कधीही भेटलो नाही. मी यापुढे कशाचीही पुष्टी करणार नाही, परंतु या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. ‘दबंग 3’ बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. पण चाहते अजूनही ‘दबंग 4’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चुलबुल पांडेला प्रेक्षकांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Indrayani: ‘चाफा बोलेना…’, ‘इंद्रायणी’ची नवी झलक प्रेक्षकांच्या भेटीला

ईदच्या दिवशी करणार धमाका

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सुपरस्टारने अलीकडेच त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना त्याने म्हटले आहे की, तो दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास आणि साजिद नाडियादवाला यांच्यासोबत ईदला चित्रपट घेऊन येणार आहे. ए. आर. मुरुगदास यांनी आमिर खानचा गजनी चित्रपट दिग्दर्शित केला होता. सलमान खानने चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले नाही, परंतु भाईजान त्याच्या सुपरहिट चित्रपट ‘किक’चा पुढचा भाग घेऊन येणार असल्याची जोरदार चर्चा मात्र आहेत.

‘या’ चित्रपटांमध्ये दिसणार 

या सुपरस्टारच्या खात्यात आणखी अनेक चित्रपट आहेत. बऱ्याच दिवसांपासून हा सुपरस्टार त्याच्या ‘द बुल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. याशिवाय सलमान ‘टायगर वर्सेस पठाण’, ‘बजरंगी भाईजान 2’ आणि ‘शेर खान’मध्येही दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज