Indrayani: ‘चाफा बोलेना…’, ‘इंद्रायणी’ची नवी झलक प्रेक्षकांच्या भेटीला
Indrayani Serial: निरागस, सालस, अवखळ, निष्पाप अशा इंदूची (Indrayani ) झलक आपल्याला पहिल्या 2 प्रोमोमधून दिसली आहे. (Indrayani Promo) नुकताच या मालिकेचा तिसरा प्रोमो लाँच झाला असून (Marathi Serial) यामध्ये आपल्याला अनिता दाते (Anita Date) मंदिरातील पैसे चोरताना दिसत आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून आपल्याला आनंदी बाई म्हणजेच अनिता दाते यांची भूमिका काय असेल, याची उत्सुकता लागली होती.
मात्र हा प्रोमो बघून तिची भूमिका नकारात्मक असावी, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ‘इंदू’ च्या प्रश्नांनी भल्याभल्यांना अचंबित केलं आहे. ‘इंदू’ अख्या गावाची लाडकी असली तरी ती आनंदीबाईंची लाडकी आहे का? असं कोडं रसिकांना पडलं आहे. ‘इंद्रायणी’च्या प्रवासात तिचं योगदान काय, हे मात्र अजून ही मोठं रहस्य आहे.
याआधी “इंद्रायणी” मालिकेच्या प्रत्येक प्रोमोने रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे. कारण यात इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देतील. या दोन तगड्या कलाकारांबरोबर “जय जय स्वामी समर्थ“ मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
Navra Maja Navsacha 2: ‘या’ कारणासाठी स्वप्नील आणि सचिन पिळगांवकर निघाले कोकणात
प्रोमोमध्ये धूर्त कावेबाज आनंदी विरूद्ध निरागस पण खट्याळ इंदूमध्ये रंगलेला डाव दिसत आहे. त्यामुळे आता हा डाव कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासाठी अवघा महाराष्ट्र जिची आतुरतेने वाट पहातोय, ती “इंद्रायणी“ महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठीवर 25 मार्चपासून सायं 7 वाजता अवतरणार आहे.