Arbaaz Khan Wedding: लग्न अरबाजचं चर्चा भाईजानच्या डान्सची.. वहिनीसोबत थिरकला ‘भाईजान’

Arbaaz Khan Wedding: लग्न अरबाजचं चर्चा भाईजानच्या डान्सची.. वहिनीसोबत थिरकला ‘भाईजान’

Salman Khan Dance In Arbaaz- Shura Wedding: बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खानने (Arbaaz Khan) दुसरे लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र डेट निश्चित होत नव्हती. रविवारी अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी (Shura Khan) लग्न केले. लग्नादरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


अरबाजच्या लग्नाला फक्त जवळच्या मित्रांनीच हजेरी लावली होती. या काळातील व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत. निकाहचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सलमान खानही (Salman Khan) त्याच्या भावाच्या लग्नात जबरदस्त थिरकताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


या लग्नादरम्यानचे काही व्हिडिओ व्हायरल भियानी यांनी शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये अनेकजण मस्ती करताना दिसत आहे. सलमान खान भावाच्या लग्नात संपूर्ण सीमा ओलांडली होती. आपल्या भावाच्या लग्नात सलमान कसा मोकळेपणाने डान्स करताना बघायला मिळाला, सध्या त्याचा हा व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. हर्षदीप कौर स्टेजवर सलमानच्या दबंग चित्रपटातील ‘तेरे मस्त-मस्त दो नैन हे’ गाणे गात आहे. सलमान खान त्याच्याच गाण्यावर पूर्ण आनंदाने नाचताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये अरबाज खानचा मुलगा अरहान खानही दिसत असून तोही वडिलांच्या लग्नात खूप आनंदी आहे. नवविवाहित वधू शूरा खानही भाईजानच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे की, सलमान खान थोडा थकलेला दिसत आहे. आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे की, वाह, सलवार कमीजमध्ये सलमान खान आणि नवविवाहित जोडप्याचे खूप खूप अभिनंदन.

Arbaaz Khan Wedding : अरबाज खानचं दुसरं लग्न होत असताना मलायका अरोरा कुठे होती? Video Viral

अरबाज खानची पत्नी शूरा खान ही फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे. ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा टंडन यांची मेकअप आर्टिस्ट आहे. अरबाज-शुराच्या लग्नात रवीनाही सहभागी झाली होती. लग्नादरम्यानचा एक व्हिडिओही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अरबाजही रवीनासोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube