Kerala : केरळमध्ये निपाह व्हायरसने हातपाय पसरले; आणखी तीन जण पॉझिटिव्ह…

Kerala : केरळमध्ये निपाह व्हायरसने हातपाय पसरले; आणखी तीन जण पॉझिटिव्ह…

Kerala : नूकतेच केरळमध्ये दोन निपाहबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आता आणखी तीन रुग्ण निपाहबाधित झाल्याचं समोर आलं आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी याबाबत माहिती दिली असून निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्रासह राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Arvind Sawant : कंत्रांटी भरती ते मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ; सावंतांनी दिला आंदोलनाचा इशारा

काही दिवसांपासून केरळमध्ये निपाह व्हायरसचा प्रार्दुभाव झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोना विषाणुचाही पहिला रुग्ण केरळमध्येच आढळून आला होता. त्यानंतरच संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूने हातपाय पसरले होते. निपाह विषाणूमुळे 30 ऑगस्ट रोजी पहिला मृत्यू झाला होता, त्यानंतर आता 11 सप्टेंबर रोजी दुसऱ्या रुग्णाची मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आता आणखीन तीन रुग्ण आढळून आले आहेत.

Maratha Reservation बद्दल सरकार सुरुवातीपासूनच संवेदनशील; ‘त्या’ व्हिडीओवर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण…

यावर आरोग्यमंत्री वीना जॉर्ज म्हणाल्या की, तीन नमुण्याची तपासणी करण्यात आली होती, हे तिन्ही निपाह पॉजिटीव्ह आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहोत, ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागातील नागरिकांची तपासणीही करण्यात येत असल्याचं जॉर्ज यांनी स्पष्ट केलं आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते बिरबल यांचे निधन, 500 हून अधिक चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या

दरम्यान, केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निपाह व्हायरसमुळे दोन जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. दोन रुग्णांच्या मृत्यूनंतर स्वत: केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी या वृत्ताला दुजोरा देत केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारला सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठवल आहे.



निपाह विषाणूची लक्षणं काय आहेत?

निपाह हा एक झुनोटिक आजार आहे. या विषाणूचा संसर्ग माणसाला प्राणी किंवा अन्नाच्या माध्यमातून होतो. संसर्गजन्य व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास या आजाराचा संसर्ग होतो. या व्हायरसमुळे ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, खोकला, श्वास घेण्यासाठी अडचण येणे, उलट्या अशा प्रकारची लक्षणं दिसून येऊ शकतात. त्यासोबतच झोप येणे, गरगरणे, मेंदूला सूज येणे अशा प्रकारची लक्षणं देखील दिसू शकतात. मेंदूला सूज आल्यानंतर रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. त्यातच त्याचा मृत्यूही होऊ शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube