दारूण पराभव समोर दिसत असल्याने बाळराजे गायब; भाजपचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
Prasad Lad on Aditya Thackeray : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ठाकरे गट सातत्याने भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. भाजपकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं आहे. दरम्यान, आता भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) जोरदार टीका केली आहे. बाळराजे बसले कुठं दडून? अशी खोचक विचारणा त्यांनी केली.
Sai Tamhankar : खतरनाक! सई ताम्हणकरचं नव फोटशूट, फोटोंवर नेटकरी फिदा
आदित्य ठाकरे यांनी सातत्याने भाजप आणि शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. झंझावती दौरे, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आणि माध्यमांत दिसत नाहीत. हाच धागा पकडून लाड यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. लाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्यंगचित्र पोस्ट करत लिहिलं की, बाळराजे बसले कुठे दडून? मागील काही दिवसांपासून न कुठली प्रेस कॉन्फरन्स ना कुठली सभा. बाबांच्या मागे मागे चालणाऱ्या बाळराजांना अहो कुठेतरी शोधा!, असं खोचक टीका त्यांनी केली.
https://twitter.com/prasadladind/status/1770372232759628187?s=46&t=fj_rF6JrfDk48u2uStHf1g
राज ठाकरे-अमित शाह भेटीत काय घडलं? फडणवीस म्हणतात, आणखी दोन दिवसानंतर…
तर लाड यांनी पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंची फरफट होतांना दाखवली आहे. त्यांच्या हातात आदित्य ठाकरेंचा फोटो दिसत आहे. आणि तो फोटो घेऊन ते इतरांकडे आदित्य ठाकरेंची चौकशी करत आहेत. समोरच्या दोन व्यक्तींना ते आदित्य ठाकरेंची विचारपूस करतात. आमचा आदित्यला पाहिले का हो तुम्ही कुठे..? ऐन निवडणुकीच्या काळात गेले दीड महिने गायब आहे हो…. त्यावर दारून पराभव समोर दिसत असल्यामुळं लपून बसला असेल, असं जळजळीत उत्तर त्यांना मिळतं.
दरम्यान, लाड यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. लाड यांनी केलेल्या टीकेला आता ठाकरे गट कशी प्रतिक्रिया देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.