Download App

Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…

Ahmednagar name change : अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दर्शवला आहे. दरम्यान, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जामखेडच्या चौंडीत साजरी करण्यात आली. कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दर्शवला आहे. आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच, असं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सागितलं आहे.

Harish Pengan : मल्याळम अभिनेते हरीश पेंगन यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन

त्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अहिल्यानगर नामांतरावर भाष्य करत करत अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावरुन राज्य सरकारकडूनही अहिल्यानगर नामांतराला मंजुरी मिळणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.

चौंडीचं ‘राजकारण’ करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागले; राम शिंदेंनी रोहीत पवारांना सुनावलं

देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले, आपल्या राज्याचा मुख्यमंत्रीच छत्रपतींचा मावळाच मुख्यमंत्री म्हणूनच अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केलं तसेच उस्मानाबादचं धाराशिव नामकरण केलं आहे. त्यामुळे आता अहमदनगरचेही नाव अहिल्यानगर होणारच असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Wrestlers Protests :कुस्तीपटूंसाठी शेतकरी नेता मैदानात, सरकारला दिला अल्टिमेटम

मागील अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव अहिल्यानगर नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शासन दरबारी केली होती. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांकडूनही शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत होता. एवढंच नाहीतर अहमदनगरचे नाव अहिल्यानगर व्हावे यासाठी यात्राही काढण्यात आली होती.

फडणवीस अन् शिंदेंसाठी आता मास्टर ब्लास्टर सचिन करणार बॅटिंग

अहमदनगरच्या नामांतरावरुन विविध समाजांकडूनही मागण्यात करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. तर काही वर्षांपूर्वीच स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर नामांतर व्हावे, अशी मागणी जोर धरु लागली होती. तर दुसरकीकडे अखिल भारतीय समता परिषदेकडून महात्मा फुलेनगर, जैन समाजाकडून आनंदनगर अशी नावे सूचवण्यात आली होती.

अखेर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीदिनीच आमदार राम शिंदे यांनी मागणी केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरच्या नामांतरावर शिक्कामोर्तब केलं आहे. अहमदनगरच नामांतर अहिल्यानगर होणारच, असं ठामपणे फडणवीसांसह एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us